हींग कसा तयार केला जातो तुम्हालाही नसेल माहीत, बघा मेकिंग व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 06:03 PM2024-04-01T18:03:26+5:302024-04-01T18:03:58+5:30
Video Of Making Asafoetida Goes Viral: इतका महत्वाचा हींग तयार कसा केला जातो हे तुम्हाला माहीत नसेल. तेच आम्ही दाखवणार आणि सांगणार आहोत. यासंबंधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Video Of Making Asafoetida Goes Viral: पदार्थाची टेस्ट वाढवण्यासोबतच अन्न पचन होण्यासाठी हींगाचा वापर केला जातो. घराघरात किचनमध्ये हींग आढळतो. पण इतका महत्वाचा हींग तयार कसा केला जातो हे तुम्हाला माहीत नसेल. तेच आम्ही दाखवणार आणि सांगणार आहोत. यासंबंधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एका खासप्रकारच्या झाडाच्या गोंदापासून हींग तयार केला जातो. फॅक्टरीमध्ये खूप मेहनत घेतल्यावर याला बाजारात विकण्यासाठी बनवलं जातं. तो कसा केला जातो ते या व्हिडीओत तुम्ही बघू शकता.
india_eat_mania नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये हींग बनवण्याची प्रोसेस दाखवण्यात आली आहे. व्हिडीओत बघू शकता की, कशाप्रकारे झाडाची मूळं कापून गोंद काढला जातो. मग तो कारखान्यात मैद्यात मिक्स करू तयार केला जातो. त्यानंतर तो सुकवला जातो आणि नंतर मशीनमध्ये याचं पावडर तयार करून विकण्यासाठी पाठवला जातो.
या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत आणि 10 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले. लोक या व्हिडीओवर कमेंट्सही करत आहेत. लोकांनी आणखी कुठला हींग चांगला असतो हेही सांगिलतं आहे.