आधी स्टाइलने केस कापू दिले नाहीत, नंतर आईने अंघोळ करायला सांगितली, ९ वर्षाच्या मुलाने थेट पोलिसांना फोन केला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 08:42 PM2023-01-05T20:42:03+5:302023-01-05T20:50:16+5:30
उत्तर प्रदेशमधील हापूड जिल्ह्यातील पोलिसांसमोर एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. पोलिसांना एका गावातून ११२ या नंबरवरुन फोन आला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलीस चक्रावले आहेत.
उत्तर प्रदेशमधील हापूड जिल्ह्यातील पोलिसांसमोर एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. पोलिसांना एका गावातून ११२ या नंबरवरुन फोन आला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलीस चक्रावले आहेत. एका ९ वर्षाच्या मुलाने पोलिसांना कॉल करुन तक्रार केली होती. या मुलाने त्याच्या आईची तक्रार केली होती. त्याच्या आईने त्याला थंडीत अंघोळ करायला सांगत होती.
पण एवढेच नव्हते. मुलाची नाराजी त्याच्या हेअरस्टाइलबद्दलही होती. गडमुक्तेश्वर परिसरातील अख्खापूर गावातील एका रहिवाशाने आपल्या 9 वर्षाच्या मुलाला केस कापण्यास सांगितले. मुलाचे वडील त्याच्यासोबत केस कर्तनालयात गेले. येथे मुलाने स्वतःच्या खास स्टाइलमध्ये केस कापायचे होते, यावर तो मुलगा ठाम होता. यावेळी त्याच्या वडिलांनी सामान्य पद्धतीने केस कापण्यास सांगितले, यावर तो मुलगा नाराज झाला.
घरी पोहोचल्यावर मुलाने नाराजी व्यक्त केली. आईने त्याला अंघोळ करायला सांगितल्यावर मुलाने थंडीचे निमित्त सांगितले. यावेळी संतापलेल्या वडिलांनी त्यांना खडसावले.
यावेळी या मुलाने रागाने पोलिसांना 112 नंबरवर फोन डायल केला. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटना ऐकून पपोलिसही हसू लागले. यावेळी पोलिसांनी मुलाची समजूत काढली.