VIDEO: आरारा खतरनाक! लग्नात दारू पिऊन आलेल्या व्यक्तीने मंडपाला आग लावून केला भन्नाट डान्स
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 04:27 PM2022-07-08T16:27:25+5:302022-07-08T16:31:19+5:30
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने दारूच्या नशेत धिंगाणा घातल्याचे पाहायला मिळत आहे.
नवी दिल्ली । भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये लग्नसमारंभात फटाक्यांचा वापर केला जातो. काहीवेळा या फटाक्यांमुळे काही गंभीर घटना देखील घडतात. अनेकवेळा अशा घटनांमुळे मोठी दुर्घटना होते. सध्या सोशल मीडियावर याचाच एक प्रत्यय देणारा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने दारूच्या नशेत धिंगाणा घातल्याचे पाहायला मिळत आहे. नशेत असलेला व्यक्ती दोन्ही हातात फुलबाजा घेऊन डान्स करत असतो, तो डान्स करताना तो एवढा रमतो की त्याने नशेमध्ये मंडपाच्या साहित्यालाच आग लावली आणि डान्सचा आनंद घेत राहिला.
दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून सर्वचजण चक्रावून गेले आहेत, कारण इथे एक मोठी दुर्घटना घडली असती. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की लग्नाच्या पार्टीत लोक इतके नशेत असतात की त्यांना काहीच समजत नाही. काही वेळा या दारूच्या नशेत काही लोकांचा आत्मविश्वास अगदी शिगेला जाऊन पोहचतो. या व्हिडीओमध्येही तेच पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये डान्स करणारा माणूस एवढा उत्साहित असतो की त्याला तो काय करतोय त्याचे भान देखील राहत नाही.
दारूच्या नशेत व्यक्तीने लावली आग
व्हिडीओमध्ये दिसत आहे की दारूच्या नशेत असलेली व्यक्ती दोन्ही हातात फुलबाजा घेऊन डान्स करत आहे. यानंतर तो एका महिलेजवळ जाऊन डान्स करू लागतो. यांनतर जे काही होतं ते पाहून तेथील लोकही चकीत झाले. कारण डान्स करताना व्यक्तीचा उत्साह आणखी वाढतो आणि तो चुकून त्याचा हात मंडपातील सजावटीच्या सामानावर ठेवतो. असे होताच त्या सामानाला आग लागते, मात्र व्यक्तीवर याचा काहीच परिणाम होत नाही.
Me : I wonder why my friends don't invite me to parties
— nftbadger (@nftbadger) July 4, 2022
Also me at parties:
pic.twitter.com/kBzQG771td
लक्षणीय बाब म्हणजे मंडपाच्या साहित्याला लागलेली आग त्या व्यक्तीने कशाचाही वापर न करता विझवली. आग विझली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. nftbadger या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आग विझवल्यानंतर देखील नशेत असलेल्या व्यक्तीने डान्स करण्याचे थांबवले नाही.