कचऱ्यात सापडलेल्या जिन्सचा लिलाव, ९४ लाख रुपयांची बोली; ही आहे खासियत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 03:30 PM2022-12-12T15:30:04+5:302022-12-12T15:31:21+5:30
बुडालेल्या जहाँजाच्या मलब्यात ही जिन्स आढळून आली. त्यानंतर, या जिन्ससाठी लिलावाचे आयोजन करण्यात आले होते
जगातील सर्वात जुन्या जिन्स पँटच्या खरेदीसाठी तब्बल ९४ लाख रुपयांची बोली लागली होती, त्या लिलावात ही पँट खरेदीही करण्यात आली आहे. सन १८५७ च्या बुडालेल्या जहाँजाच्या मलब्यात, कचऱ्यात ही जिन्स आढळून आली. ही जिन्स कोणत्या कंपनीची आहे, हे अद्याप समजले नाही. तरीही लिवाईस कंपनीची ही पँट असल्याचा दावा काहींनी केला आहे. मात्र, कंपनीने ही जिन्स आपल्या कंपनीची नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
बुडालेल्या जहाँजाच्या मलब्यात ही जिन्स आढळून आली. त्यानंतर, या जिन्ससाठी लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये तब्बल ९४ लाख रुपयांची बोली या पँटला लागली. अमेरिकेतील राज्य नॉर्थ कॅरोलिना येथे ही जिन्स आढळून आली. ५ बटन असलेल्या पांढऱ्या रंगाच्या या जिन्सबद्दल एक गोंधळही आहे. तो म्हणजे या जिन्सला कोणत्या कंपनीने बनवले. काही लोक या जिन्सला लेवी स्ट्रॉस कंपनीची असल्याचं सांगतात. मात्र, या कंपनीची पहिली जिन्स १८७३ मध्ये बनली होती. तर, ही जिन्स त्यापूर्वी १६ वर्षे म्हणजेच १८५७ मध्ये बनली आहे.
एक गोष्ट नक्की आहे की, ही जिन्स 12 सप्टेंबर १८५७ च्या अगोदर तयार झालेली आहे. कारण, ही पँट त्या जहाँजातून मिळाली आहे, जे जहाँज एका वादळात १२ सप्टेंबर १८५७ रोजी बुडाले होते. सैन फ्रांसिस्को येथून पनामा मार्गे न्यूयॉर्क असा प्रवास हे जहाँज करत होते. मात्र, यापेक्षा अधिक जुनी जिन्स असण्याचे काहीही पुरावे नाहीत. या जिन्सचे लिलाव करणारे आणि कॅलिफोर्निया गोल्ड मार्केटींग ग्रुपचे मॅनेजिंग पार्टनर ड्वाईट मैनले यांनी म्हटले की, ही मायनर्स जिन्स चंद्रावरील पहिला झेंड्यासारखी आहे, ही ऐतिहासिक आहे. म्हणूनच या पँटचा लिलाव झाला.