'बाला ओ बाला' वर काकु जोमात तर नेटकरी कोमात, हा डान्स बघुन तुम्ही हसु आवरु शकणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 08:15 PM2021-11-07T20:15:56+5:302021-11-07T20:17:01+5:30

एक काकूबाई आपल्या देशी डान्स स्टेपनं सर्वांचं मन जिंकत आहेत. या काकूबाईंचा डान्स पाहून आसपास उपस्थित असलेले लोकही भरपूर हसतात आणि टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह आणखी वाढवतात.

aunty dancing on bala ho bala song funny dance video goes viral | 'बाला ओ बाला' वर काकु जोमात तर नेटकरी कोमात, हा डान्स बघुन तुम्ही हसु आवरु शकणार नाही

'बाला ओ बाला' वर काकु जोमात तर नेटकरी कोमात, हा डान्स बघुन तुम्ही हसु आवरु शकणार नाही

Next

भारतीय लग्नांमध्ये नाचणं आणि गाणं हा जणू एक अविभाज्य भागच आहे. लग्न हा एक असा कार्यक्रम आहे ज्यात लोक सर्व रुसवे फुगवे विसरून एकत्र येतात आणि आनंद साजरा करता. सध्या असाच एक व्हिडिओ (Wedding Video) सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

३७ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बॅकग्राऊंडमध्ये डीजे वाजत आहे. व्हिडिओमध्ये (Dance Video of Aunty) एक काकूबाई आपल्या देशी डान्स स्टेपनं सर्वांचं मन जिंकत आहेत. या काकूबाईंचा डान्स पाहून आसपास उपस्थित असलेले लोकही भरपूर हसतात आणि टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह आणखी वाढवतात.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की गाणं ऐकताच एक काकूबाई मैदानात येतात. आधी त्या नागिन सॉन्गवर मजेशीर डान्स करतात आणि यानंतरच्या 'बाला' या गाण्यावर त्या असा डान्स करतात की आसपास बसलेले सगळेच हसू लागतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर Giedde नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. यावर यूजर्स मजेशीर कमेंट करत आहेत.

बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 13 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. याच कारणामुळे अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं यावर कमेंट करत लिहिलं, वरात्यांनी या काकूबाईकडून डान्सचे धडे घ्यायला पाहिजे. तर दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, हा व्हिडिओ पाहून मला हसू आवरता येत नाहीये. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.


 

Web Title: aunty dancing on bala ho bala song funny dance video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.