या जंगलात लपलाय विषारी साप; बघा सापडतोय का? अनेकांनी मानली हार पण साप काही दिसला नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 04:10 PM2021-01-27T16:10:29+5:302021-01-27T16:19:05+5:30
ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रजातीचे साप आढळून येतात.
एक ऑस्ट्रेलियाच्या साप पकणाऱ्या एका संस्थेनं वुडलँडमधील एका जंगलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. सनशाईन कोस्ट स्नेक कॅचर्स स्पॉट द स्नेक या गेममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सापांचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यांनी सांगितले की, सापाची संख्या सांगणाऱ्याला चांगले पॉईंट्स मिळणार. ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रजातीचे साप आढळून येतात.
या फोटोत तुम्ही पाहू शकता एक घनदाट जंगल दिसत आहे. ही जमिन गवत आणि हिरव्या रंगाच्या पानांनी झाकले गेले आहे. पहिल्यांदा तुम्ही पाहिल्यानंतर कोणताही साप दिसून येत नाही. नीट पाहिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अनेक साप दिसून येतील. या व्हिडीओला ७०० पेक्षा जास्त लाईक्स आले असून जवळपास ९०० पेक्षा जास्त लोकांनी या फोटोतील सापांची संख्या शोधण्याचा प्रयत्न केला आहे. गायला सुरूवात करताच कुत्रा-मांजरांसह माणसांनी केलं असं काही; रेहमानने शेअर केला भन्नाट VIDEO
अनेकांनी शोधूनही साप सापडला नसल्याचे मान्य केले आहे. सोशल मीडियावरील या फोटोनं अनेकांना व्यस्त ठेवले आहे. एका फेसबुक युजरने लिहिलेले, " जेव्हा झाडांच्या फांद्या, पानं साप बनतात तेव्हा मला त्यांच्याशी प्रेम होतं. तर दुसऱ्या युजरनं सांगितलं की फांद्या, पानं, आणि झाडं दिसली पण साप मात्र दिसला नाही. मला असं काहीही जाणवलं नाही.'' बापरे! डोक्यावर भलीमोठी बाईक घेतली अन् एका झटक्यात बसवर चढला; व्हिडीओ पाहून नेटिझन्स म्हणाले...