बापरे! रस्त्याला तडा गेल्यानं पडला २५ फूट खोल खड्डा; काही सेकंदातच महिला प्रवाश्यासह रिक्षा खड्डात
By manali.bagul | Published: January 24, 2021 01:24 PM2021-01-24T13:24:44+5:302021-01-24T13:24:57+5:30
रिक्षा चालकाला काही कळायच्या आतच रिक्षा खाली पडली आणि रिक्षा चालक काहीही करू शकला नाही. या घटनेत रिक्षा चालक आणि प्रवासी महिला गंभीर जखमी झाले आहेत.
राजस्थानच्या पिंक सिटीमध्ये विकास आणि रस्ते वाहतूक व्यवस्थेची चांगलीच पोलखोल झाली आहे. सचिवालायापासून एक किलोमीटर दूर असलल्या चौमूं चौकावर शनिवारी सकाळी अचानक एक मोठा खड्डा पडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. रस्त्यावर अचानक पडलेल्या २५ खोल आणि ३० फूट लांब खड्ड्यात एक रिक्षा पडली असून या रिक्षात एक महिला प्रवासी होती. ही घटना इतक्या अचानक घडली की, रिक्षा चालकाला काही कळायच्या आतच रिक्षा खाली पडली आणि रिक्षा चालक काहीही करू शकला नाही. या घटनेत रिक्षा चालक आणि प्रवासी महिला गंभीर जखमी झाले आहेत.
World class city #Jaipur with spent of 5000 crores on master drainage. @8PMnoCMpic.twitter.com/Rr9W7YcIRd
— RAVINDRA SINGH (@RavinIND) January 23, 2021
सदर घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर त्या ठिकाणी एक सुरक्षा रक्षक आणि आजूबाजूचे रिक्षा चालक पोहोचले. रिक्षा सुरू करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोरीचा वापर करत या खड्ड्यातून रिक्षा चालक आणि महिलेला बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आई ती आईच! समोर आला माय लेकाच्या भेटीचा अनोखा व्हिडीओ; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक
जेसीबीच्या मदतीने रिक्षा बाहेर काढण्यात आली. चौंमू चौक हा सगळ्यात जास्त वर्दळ असलेल्या रस्त्यापैकी एक आहे. सकाळच्यावेळी ही घटना घडली असती तर नुकसानाचा सामना करावा लागला असता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सरकार आणि प्रशासनावर टिकेचा वर्षाव केला जात आहे. यापुढे असं काही होऊ नये यासाठी या घटनेची पूर्ण चौकशी व्हायला हवी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. डिलिव्हरी बॉयनं स्वत:च कॅन्सल केली ऑर्डर, नंतर ग्राहकाच्या घरासमोरच बसून खाऊनही टाकलं