बाबो! चालत्या ऑटो-रिक्षाचा बदलला टायर, लोक म्हणाले, अरे...हे तर जेम्स बॉन्डचे पप्पा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 11:27 AM2019-09-25T11:27:09+5:302019-09-25T12:08:31+5:30

गाड्यांचे गॅरेजमध्ये टायर कसे बदलले जातात हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, पण अशाप्रकारचा कारनामा पहिल्यांदाच लोकांनी पाहिला. त्यामुळे लोक हैराण झाले आहेत. 

Auto rickshaw man change the tyre while driving video goes viral | बाबो! चालत्या ऑटो-रिक्षाचा बदलला टायर, लोक म्हणाले, अरे...हे तर जेम्स बॉन्डचे पप्पा...

बाबो! चालत्या ऑटो-रिक्षाचा बदलला टायर, लोक म्हणाले, अरे...हे तर जेम्स बॉन्डचे पप्पा...

googlenewsNext

सोशल मीडियात एक अफलातून व्हिडीओ व्हायरल झाला असून हा व्हिडीओ उद्योगपती हर्ष गोयनका यांनीही शेअर केला आहे. या व्हिडीओत भर रस्त्यात चालत्या ऑटोरिक्षाचा टायर बदलण्यात आल्याचं बघायला मिळतं. गाड्यांचे गॅरेजमध्ये टायर कसे बदलले जातात हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, पण अशाप्रकारचा कारनामा पहिल्यांदाच लोकांनी पाहिला. त्यामुळे लोक हैराण झाले आहेत. 

आधी व्हिडीओ बघा नंतर कमेंट वाचा....

आता एवढा भन्नाट व्हिडीओ पाहिल्यावर लोक यावर मजेदार कमेंट करणार नाहीत, असं तर होणार नाही. काही लोक म्हणताहेत की, या लोकांना चंद्रावर पाठवा...जेणेकरून विक्रमला ठीक करू शकेल. तर काही लोकांना आता यांना किती रूपयांचा चालान लागेल याची चिंता लागली आहे. असो, पण हा व्हिडीओ कुठला आहे आणि कधी शूट केलाय याची माहिती मिळू शकली नाही. पण यावर लोकांच्या कमेंट मात्र फारच मजेशीर येत आहेत.

या तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे एक ऑटोरिक्षा रस्त्यावर सरळ चालत असताना वाकडा होतो. म्हणजे दोन चाकांवर होतो. नंतर रिक्षात मागे बसलेली एक व्यक्ती मागचा टायर बदलून त्याजागी दुसरा टायर लावतो. 

Web Title: Auto rickshaw man change the tyre while driving video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.