फसवणूक टाळा; कारच्या जुन्या टायरला असे बनवतात नवीन, video पाहून चक्रावून जाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 06:51 PM2024-03-24T18:51:32+5:302024-03-24T18:52:14+5:30
जुने टायर वापरणे अतिशय धोकादायक ठरू शकते.
viral video: तुमच्या बाईक अथवा कारचे टायर जुने होताच ते बदलणे गरजेचे असते. कारण, हे जुने टायर अतिशय धोकादायक ठरू शकते. गाडीचे टायर जुने झाल्यावर बहुतांश लोक दुकानातून नवीन टायर विकत घेतात. पण, असेही काही लोक असतात, जे स्वस्तात जुने टायर खरेदी करातात. भारतात अशी अनेक दुकाने आहेत, जिथे जुने टायर रिसायकल(नवीन करणे) केले जाते. ही रिसायकल्ड टायरे स्वस्त असतात, पण अपघातास कारणीभूत ठरू शकतात.
पाहा जुन्या टायरला नवीन करण्याची पद्धत
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये टाकाऊ टायरला नवीन कसे केले जाते, हे दाखवण्यात आले आहे. याची संपूर्ण निर्मिती प्रक्रिया या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. जीर्ण टायरला खाचे पाडून नवीन करण्यात येते आणि काळ्या रंगाचे पॉलिश केले जाते. शेवटी या टायरला नवीन रॅपिंग केली जाते. महत्वाची गोष्ट म्हणजे, जुन्या टायरला नवीन केल्यानंतर तुम्ही यातला फरक ओळखू शकणार नाहीत.
Buy new tyres only from authorised dealers. In trying to save money, you could lose your life.
— Vinod Sharma (@vinod_sharma) March 23, 2024
Watch this horrifying video. pic.twitter.com/njaqBYYsRT
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @vinod_sharma नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, 'अधिकृत डीलर्सकडून नवीन टायर खरेदी करा. पैसे वाचवण्याच्या प्रयत्नात तुम्ही तुमचा जीवही गमावू शकता,' असे कॅप्शन दिले आहे. पाच मिनिटे 29 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 7 लाख 7 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.