भन्नाट! कॅब ड्रायव्हर प्रवाशांना चिप्स-कोल्ड ड्रिंक्सपासून वाय-फायपर्यंत प्रवाशांना मोफत देतोय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 08:07 PM2023-06-29T20:07:18+5:302023-06-29T20:08:44+5:30
सोशल मीडियावर एका कॅब ड्राईव्हरचा फोटो व्हायरल झाला आहे.
आपण शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी कॅबचा वापर करतो. सध्या शहरात कॅबची संख्यांही वाढली आहे. कॅब ड्राईव्हर आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करतात. सध्या असाच एक कॅब डाईव्हर व्हायरल झाला आहे. अलीकडे एक कॅब ड्रायव्हर देखील व्हायरल होत आहे. त्याची सेवा आणि कारच्या आतील बाजूचे स्वरूप हे कारण आहे. त्याची कार एखाद्या मोबाईल शॉपसारखी दिसते कारण तो त्याच्या प्रवाशांची विशेष काळजी घेतो.
पतीने किन्नरसोबत लग्न केल्यावर पत्नीने उचललं धक्कादायक पाउल
@RTIExpress या ट्विटर अकाऊंटने अलीकडेच दिल्लीतील एका व्हायरल कॅब ड्रायव्हरचा उल्लेख केला आहे, ज्याला त्याचे काम इतके आवडते की ते त्याच्या सेवांमध्ये आणि त्याच्या कारमध्ये दिसून येते. ही व्यक्ती बर्याच दिवसांपासून Uber सोबत कॅब चालवत आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या ७ वर्षांत त्यांनी एकही राइड रद्द केली असेल असे क्वचितच घडले असेल.
या कारच्या आतील फोटो शेअर केला आहे, या कॅप्सनमध्ये वापरकर्त्याने लिहिले - “आज मी 48 वर्षांच्या अब्दुल कादिरच्या उबेर कॅबमध्ये बसलो जो एक अतिशय मनोरंजक व्यक्ती आहे. प्रथमोपचार किटपासून सुरुवात करून नाश्त्याची व्यवस्थाही त्यांच्या कारमध्ये केली जाते. या सर्व गोष्टी ते प्रवाशांना मोफत देतात. याशिवाय त्यांच्याकडे गरीब मुलांसाठी दानपेटीही आहे. गेल्या ७ वर्षात त्यांनी क्वचितच एकही राइड रद्द केली.
कॅबच्या आतला आकर्षक देखावा आहे. पाण्याच्या बाटल्या, कोल्ड्रिंक्स, चिप्स, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तू आत दिसत आहेत. यासोबतच वाहनाच्या एका कोपऱ्यात डस्टबिनही ठेवण्यात आला आहे. फोटोमध्ये टिश्यू आणि छत्री देखील आहेत. ही पोस्ट व्हायरल होत आहे. याला 60 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.