बाप रे बाप! गाडीच्या काचेवर साप, दोन तास जीव मुठीत धरून केला प्रवास....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 07:16 PM2021-07-13T19:16:18+5:302021-07-13T21:15:31+5:30
पावसाळ्यात सापाचं दर्शन रानावनात, आडवाटेवर जास्तीतजास्त रस्त्यात होऊ शकतं. पण समजा तुम्हाला गाडीच्या काचेवर साप दिसला तर तुमची काय गत होईल? मात्र एका कारमधील प्रवाशांनी या गाडीच्या काचेवरील सापासकट दोन तास प्रवास केला....
काहीवेळा अशा काही गोष्टी घडतात की भल्या भल्यांची भंबेरी उडते. माणूस कितीही तगडा असू दे पण सापाला पाहिल्यावर कोणाचीही पाचावर धारण बसू शकते. सापाची धडकी भल्या भल्यांची झोप उडवते. अशीच एक गोष्ट नाशिक-मध्यप्रदेश महामार्गावर घडलीये. पावसाळ्यात सापाचं दर्शन रानावनात, आडवाटेवर जास्तीतजास्त रस्त्यात होऊ शकतं. पण समजा तुम्हाला गाडीच्या काचेवर साप दिसला तर तुमची काय गत होईल? याचा थरारक व्हिडिओ News18 लोकमत च्या संकेतस्थळावर पोस्ट करण्यात आला आहे.
तुम्हाला या प्रश्नानेच भीती वाटली असेल पण एका व्यक्तीच्या कारच्या काचेवर सापाने दर्शन दिले तेही जेव्हा गाडी प्रवासात असताना. 11 जुलै रोजी मध्य प्रदेशमधील अंजड येथील छोटू सिंग राजपूत यांना भेटून रत्नदिप सिसोदिया आपल्या कुटुंबीयांसह परत येत असताना त्यांच्या शेतातील घराजवळ कसे साप येतात अशा गप्पा गाडीत सुरू असताना भाचा रितेशला गाडीच्या बोनेटवर एक साप आढळून आला. गाडी महामार्गावर त्यामुळे काही करणं शक्यच नव्हतं. मग काय दोन तास रत्नदीप सिसोदिया यांनी तशीच गाडी ड्राईव्ह केली. शेवटी त्यांनी गाडी शिरपूर साखर कारखाना जवळील महामार्ग पोलिसांची चौकी गाठली.
त्यानंतर सर्पमित्र प्रेम ब्रिहाडे यांना बोलावले. गाडीच्या मागच्या बाजूला सर्प गेल्याने दहिवद येथील हॉटेल पद्मावतच्या बाजूला सर्विस स्टेशनच्या रॅम्पवरगाडी चढून अथक प्रयत्नातून सापला अखेर बाहेर काढण्यात आले. त्यानंतर या सापाला जंगलात सोडून देण्यात आलं. तोपर्यंत ड्रायव्हर आणि आतील प्रवाशांनी जीव मुठीत धरुन प्रवास केला होता.