'बाबा का ढाबा' चालवणाऱ्या बाबांनी फसवणूकीचा आरोप केल्यानंतर यु-ट्यूबरनं दिलं उत्तर; म्हणाला....
By manali.bagul | Published: November 10, 2020 12:37 PM2020-11-10T12:37:12+5:302020-11-10T12:41:54+5:30
#Baba ka Dhaba : "बाबा का ढाबा"ला प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या, त्याचं नाव चर्चेत आणणाऱ्या व्यक्तीविरोधात बाबांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली होती.
आपल्या दयनिय अवस्थेमुळे रडू कोसळ्यानंतर बाबा का ढाबा चालवत असलेल्या कांताप्रसाद या बाबांचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर अनेक ठिकाणाहून दिल्लीतील मालविया नगरमधलील बाबांना मदतीचे हात पुढे आहे. यु-युट्यूबर गौरवने बाबांचा व्हिडीओ काढल्यामुळे बाबांना अच्छे दिन आले होते. मात्र "बाबा का ढाबा"ला प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या, त्याचं नाव चर्चेत आणणाऱ्या व्यक्तीविरोधात बाबांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली होती.
"बाबा का ढाबा"चे मालक कांता प्रसाद (Kanta Prasad) यांनी ट्यूबर गौरव वासन (Gaurav Wasan) विरोधात तक्रार दाखल केली होती. ढाब्याच्या नावावर पैशांची अफरातफर केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. कांता प्रसाद यांच्या मदतीसाठी आलेल्या पैशांमध्ये अफरातफर केली गेली असल्याचं बाबांनी म्हटलं होतं. गौरव वासन याने सर्वप्रथम या बाबांचा व्हिडीओ तयार केला होता. त्यानंतर बाबा का ढाबा प्रचंड लोकप्रिय झाला आणि लोकांनी वृद्ध दाम्पत्याला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला होता. क्या बोनस है रे बाबा! बोनसची वाट पाहण्याच्या नादात नेटकऱ्यांनी पाडला भन्नाट मीम्सचा पाऊस; पाहा फोटो
या आरोपांनंतर आता गौरवने आपली बाजू मांडली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता गौरव या वृद्ध दाम्पत्याला २ लाख रुपयांचा चेक देत आहे. रेडीओ मिर्चीशी बोलताना याबाबत गौरवने स्पष्टीकरण दिलं आहे. गौरव म्हणाला, ''बाबांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या खात्यात २० लाख रुपये जमा झालेले असून हे पैसे त्यांना मिळालेले नाही. पण बँकेच्या स्टेटमेंटनुसार बाबांना हे पैसे मिळाले आहेत. माझे पालक सुद्धा ढाबा चालवतात म्हणून मी आपुलकिने आपले आजोबा समजून त्यांची मदत केली.'' गौरवचा हा व्हिडीओ पाहून अनेकजण भावूक झाले आहेत. या प्रकारानंतर अनेकांचा माणूसकीवरून विश्वास उडाला आहे. लोकांनी या व्हिडीयोवर वेगवेगळ्या कमेंट्स करून आपलं मत मांडलं आहे. चमत्कार! 'हे' २ शब्द ऐकून शुद्धीवर आला तब्बल ६२ दिवसांपासून कोमात गेलेला १८ वर्षीय तरूण
Baba says Gaurav's biggest mistake was to 'make that video'!
— Sayema (@_sayema) November 6, 2020
As police registers a case against Gaurav Wasan, he tells @MirchiVidit the REAL reason why he helped #BabaKaDhaba
Today, he feels cheated, dejected, torn. Does he deserve this? #GauravWasan#Mirchipic.twitter.com/D5MqoBPEZp