Baba Ka Dhaba: पहिल्या लॉकडाऊनने भरभरून दिले, दुसऱ्याने काढून घेतले; बाबा का ढाबा बंद झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 01:57 PM2021-06-08T13:57:46+5:302021-06-08T13:59:06+5:30

Baba Ka Dhaba closed: दक्षिण दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये ढाबा चालविणारे कांता प्रसाद (Kanta Prasad) आणि त्यांची पत्नी बादामी देवींचे (Badami devi) नशीब फळफळले होते. त्यांच्यावर बनविलेला एक व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला होता. ट्विटरवर तर ते सतत टॉप ट्रेंडिंगमध्ये होते.

Baba Ka Dhaba Couple Returns to Old hotel; closed due to lockdown | Baba Ka Dhaba: पहिल्या लॉकडाऊनने भरभरून दिले, दुसऱ्याने काढून घेतले; बाबा का ढाबा बंद झाला

Baba Ka Dhaba: पहिल्या लॉकडाऊनने भरभरून दिले, दुसऱ्याने काढून घेतले; बाबा का ढाबा बंद झाला

googlenewsNext

आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. गेल्या वर्षीच Baba Ka Dhaba खूप प्रसिद्ध झाला होता. दक्षिण दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये ढाबा चालविणारे कांता प्रसाद (Kanta Prasad) आणि त्यांची पत्नी बादामी देवींचे (Badami devi) नशीब फळफळले होते. त्यांच्यावर बनविलेला एक व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला होता. ट्विटरवर तर ते सतत टॉप ट्रेंडिंगमध्ये होते. लोक यानंतर त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये रांगा लावू लागले. बाबा फेमस झाले. मात्र, आता त्यांच्यावर आभाळ कोसळल्याचे वृत्त आले आहे. पुन्हा बाबा का ढाबा रेस्टॉरंट बंद करून जुन्याच जागेवर आले आहेत. (Baba ka dhaba restaurant Closed, no customers came in Lockdown, huge loss.)


सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या व्यवसायात मोठी वाढ झाली होती. मात्र, गेल्या फेब्रुवारीमध्ये त्यांचे नवीन रेस्टॉरंट बंद झाले. आता ते पुन्हा जुन्या ढाब्यावर आले आहेत. याच ठिकाणहून त्यांच्या खाद्यपदार्थांना मोठी मागणी वाढली होती. मात्र, लॉकडाऊनने त्यांच्या खपामध्ये मोठी घट झाली आहे. यामुळे खर्च परवडत नसल्याने त्यांना हे रेस्टॉरंट बंद करावे लागल्याचे व्हायरल होत आहे. 


बाबानी सांगितले की, दिल्लीमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रेस्टॉरंटचा व्यवसाय ठप्प झाला होता. लॉकडाऊनमुळे दिवसाचा खप कमी झाला. लॉकडाऊनआधी 3,500 रुपये व्यवसाय होत होता. आता 1000 रुपये होत आहे. ही रक्कम आमच्या कुटुंबासाठी पुरेशी नाहीय. 


बाबानी जो नवीन व्यवसाय सुरु केला होता, तो तीन महिन्यांतच बंद झाला. यामध्ये त्यांनी 5 लाख रुपये गुंतविले होते, काही कर्मचारी नोकरीवर ठेवले होते. भाडे 35000 रुपये, वीज पाण्यासाठी 15000 रुपये खर्च होत होते. मात्र, विक्री 40000 हून अधिक होत नव्हती. यामुळे नुकसानीत होतो, असे बाबा यांनी सांगितले.

Web Title: Baba Ka Dhaba Couple Returns to Old hotel; closed due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.