Video! ...जेव्हा मगरीची पिल्लं एका मोठ्या बगळ्याशी पंगा घेतात, बघा पुढे काय होतं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 11:00 AM2020-06-23T11:00:17+5:302020-06-23T11:02:17+5:30

मगरीच्या काही पिल्लांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात मगरीची पिल्लं एका मोठ्या बगळ्यासोबत पंगा घेत आहेत. 

Baby alligators vs giant stork fight watch viral vide | Video! ...जेव्हा मगरीची पिल्लं एका मोठ्या बगळ्याशी पंगा घेतात, बघा पुढे काय होतं!

Video! ...जेव्हा मगरीची पिल्लं एका मोठ्या बगळ्याशी पंगा घेतात, बघा पुढे काय होतं!

Next

मगर कशाप्रकारे काही सेकंदात आपली शिकार खातो याचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियात पाहिले असतील. मगरीच्या भव्य जबड्यात कमालीची ताकद असते. अनेकदा तर मगर जवळून हवेत उडणाऱ्या पक्ष्यांनाही पकडते. पण हे सगळं एक मगर तेव्हा करू शकते जेव्हा ती वयस्क होते. मगरीची पिल्लं फार ताकदवर नसतात. अशाच मगरीच्या काही पिल्लांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात मगरीची पिल्लं एका मोठ्या बगळ्यासोबत पंगा घेत आहेत. 

gatorland_orlando नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आणि आतापर्यंत या व्हिडीओला 1 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

तुम्ही बघू शकता की, मगरीचे खूपसारे पिल्लं पाण्यात आहेत. पाण्यात लाकडाचं एक प्लॅटफॉर्मही आहे. ज्यावरून एक बगळा मासे पकडत आहे. पण अशात मगरीचं एक पिल्लू बगळ्यावर हल्ला करतं. बगळा सुद्धा आपले पंख पसरवून हल्ला करतं. थोडा वेळ जोश दाखवल्यावर मगरीच्या पिल्लांचा जोश जरा कमजोर पडतो. 

बगळा मगरीच्या पिल्लांवर आक्रामक होतो आणि आपले मासे पकडणं सुरू ठेवतो. मगरीची पिल्लंही समजून जातात की, त्यांनी जरा मोठ्या बगळ्यासोबत पंगा घेतलाय. मगरीचं विशाल आणि शक्तीशाली रूप अनेकदा पाहिल्यावर हा व्हिडीओ पाहून जरा वेगळा फिल येतो. कारण मगरीच्या पिल्लांकडे फार कुणी लक्षच देत नाहीत. 

Viral Video : 'त्याच्या' तळहातावरील पाणी पित होता साप, अनोखा व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्...

जिंदगी जिंदाबाद! 'ही' दिव्यांग व्यक्ती आहे सोशल मीडिया स्टार, त्याचा आत्मविश्वास पाहून ठोकाल त्याला सलाम...

Web Title: Baby alligators vs giant stork fight watch viral vide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.