काय सांगता? 8 पायांच्या पिल्लाला शेळीने दिला जन्म; पाहण्यासाठी लोकांची झुंबड अन् 5 मिनिटांत झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 11:45 AM2021-07-20T11:45:34+5:302021-07-20T11:54:54+5:30
Baby goat born with 8 legs and 2 hips : शेळीने आठ पायांच्या पिल्लाला जन्म दिल्याची माहिती गावात वाऱ्याच्या वेगाने पसरली होती. यानंतर गावातील अनेकांनी शेळीच्या पिल्लाला पाहण्यासाठी मोंडल यांच्या घरी मोठी गर्दी केली.
नवी दिल्ली - देशात अनेक अजब-गजब घटना या घडत असतात. अशीच एक घटना आता पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. एका शेळीने तब्बल 8 पाय (8 Legs and 2 hips) असणाऱ्या पिल्लाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. या शेळीच्या पिल्लाचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहेत. फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून काहींनी हा चमत्कार असल्याचं म्हटलं आहे. पिल्लाला पाहण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. गावकऱ्यांसोबतच इतरही लोकांनी या गावात धाव घेत मोठी गर्दी केल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या बनगावातील कमलेघा परिसरात ही अजब घटना घडली आहे. सरस्वती मोंडल या महिलेकडे शेळ्य़ा, गाय यासह अनेक पाळीव प्राणी आहेत. त्याच्याकडील शेळीने दोन पिल्लांना जन्म दिला. त्यातील एक पिल्लू सामान्य होतं. तर दुसऱ्या पिल्लाला आठ पाय होते. शेळीने आठ पायांच्या पिल्लाला जन्म दिल्याची माहिती गावात वाऱ्याच्या वेगाने पसरली होती. यानंतर गावातील अनेकांनी शेळीच्या पिल्लाला पाहण्यासाठी मोंडल यांच्या घरी मोठी गर्दी केली.
सोशल मीडियावर या शेळीच्या आठ पायांच्या पिल्लाचे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. मात्र जन्मानंतर काही मिनिटांतच संबंधित शेळीच्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे. सरस्वती मोंडल यांना याबाबत विचारलं असता त्यांनी इंडिया टुडेला याबाबत माहिती दिली आहे. "आठ पायांच्या पिल्लाला शेळीने जन्म दिल्याची घटना मी पहिल्यांदाच पाहत आहे. याचं मलाही आश्चर्य वाटत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे आठ पायांच्या पिल्लाचा जन्मानंतर अवघ्या पाचच मिनिटांत मृत्यू झाला आहे. पण शेळीचं दुसरं पिल्लू आणि शेळी दोघंही सुखरुप आहेत" असं मोंडल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये मजुराने लढवली शक्कल, कर्ज काढून फोन घेतला अन्...#lockdown#IsakMunda#YouTube#moneyhttps://t.co/xzxh48DOha
— Lokmat (@MiLOKMAT) July 17, 2021