धक्कादायक! मुल की घटस्फोट; पतीने दिला असा अल्टिमेटम, पत्नीला धक्का बसला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 05:35 PM2023-04-22T17:35:53+5:302023-04-22T17:39:23+5:30
मला मुल नको आहे म्हणून पती मला घटस्फोट देत आहे, असं पत्नीने सांगितलं.
आताच्या काळात लग्न झाल्यानंतर अनेकांना लगेच मुल जन्माला घालायच नसतं. या कारणामुळे अनेकांच्यात भांडण, वाद-विवाद होत असतात. असाच एक प्रकरण सध्या समोर आलं आहे. दोन वर्षापूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्यामध्ये मोठा वाद झाला आहे. या प्रकरणी पत्नीने सोशल मीडियावर पोस्ट लिहून पतीवर आरोप केले आहेत. पतीने ३३ वर्षीय पत्नीला दोन वर्षात मुल जन्माला घालण्यासाठी अल्टीमेटम दिल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.
हे प्रकरण चीनमधील झेंजियांग प्रांतातील आहे. चिनी सोशल मीडियावर महिलेचा भूतकाळ चर्चेचा विषय बनला आहे. तिने एक पोस्ट पोस्ट केली आणि सांगितले की ती ३५ वर्षांची होईपर्यंत गर्भवती झाली नाही तर तिच्या पतीने तिला घटस्फोट देण्याची धमकी दिली आहे. लग्नाच्या दोन वर्षांपर्यंत सर्व काही चांगले होते. पण जेव्हा पतीने मुले जन्माला घालण्याचा अल्टिमेटम दिला तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला. मला मूल नको म्हणून नवरा मला घटस्फोट देईल. त्यांनी दोन वर्षांचा कालावधी दिला आहे. जर मी वयाच्या ३५ व्या वर्षी मुलाला जन्म दिला नाही तर तो मला कायमचा सोडून जाईल, असं तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
Viral Video : पती माझ्यासाठी गाणं गात नाही, पत्नी थेट पोलीस स्टेशनला पोहचली; पतीला बोलावलं, मग..
शाओमीच्या पतीने असा युक्तिवाद केला आहे की, ३५ वर्षांनंतर मूल झाल्यास पत्नीच्या आरोग्यास हानी पोहोचते. दरम्यान, शाओमीचा विश्वास आहे की आई झाल्यानंतर तिच्या जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम होईल. तिला आई व्हायचे आहे पण तिच्या मनाप्रमाणे. कोणाच्या सांगण्यावरून नाही, असं तिने म्हटले आहे.
शाओमीचा दावा आहे की, तिच्या पतीने अल्टिमेटम दिला आहे. एकतर त्यांना मूल हवे आहे किंवा घटस्फोट हवा आहे. कोंडीत सापडलेल्या शाओमीने सोशल मीडियावर लोकांकडून सल्ला मागितला आहे. त्याची पोस्ट व्हायरल होत आहे. यावर एका युजरने म्हटले - मुलाला जन्म द्यायचा की नाही, ही महिलांची निवड असावी. आणखी एका यूजरने लिहिले - प्रत्येकाला त्याचे आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. तिसरा वापरकर्ता म्हणाला - कुटुंबाची देखील काळजी घेतली पाहिजे. आणखी एका यूजरने लिहिले - महिलांना वेळ द्यायला हवा. निर्णय तिला घ्यायचा आहे. चीनमध्ये महिलांवर मुले होण्यासाठी दबाव टाकण्याच्या किस्से ऑनलाइन चर्चेचे कारण बनतात.