अरे बाप रे! प्रचंड गर्दी, तरुणाचा बसच्या मागे लटकून जीवघेणा प्रवास; व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 02:05 PM2023-12-02T14:05:09+5:302023-12-02T14:06:23+5:30
जीवाची मुंबई म्हणणाऱ्या लोकांसाठी सार्वजनिक सेवांमध्ये वाढत चाललेली गर्दी ही समस्या गंभीर बनत चालली आहे. रोजच्या रहाटगाड्यात प्रवासातील कसरत किंवा प्रवासात करावी लागणारी चढाओढ हे एक भीषण वास्तव आहे.
Viral Video : मुंबई आणि तेथील वाढती गर्दी हे न सुटणारे कोडे आहे. वाढती गर्दी, नागरिकांचे मुंबईत होणारे स्थलांतर आणि त्याचा जनमानसावर होणारा परिणाम हा चर्चेचा विषय आहे. त्यातच बस, ट्रेन अशा सार्वजनिक सेवांमधील गर्दी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे बस किंवा ट्रेनमधून प्रवास करताना नागरिकांच्या अक्षरश: नाकी नऊ येतात. अशा तुडूंब गर्दीतून मुंबईकरांचा प्रवास असतो. याचाच प्रत्यय देणारे एक उदाहरण समोर आले आहे. आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी जीवावर उदार होऊन लोक प्रवास करतात. मुंबईसारख्या शहरात नोकरदार वर्ग तसेच सर्वसामान्यांची प्रवासासाठी सार्वजनिक वाहनांना सर्वाधिक पसंती असते.
आपल्या ठरलेल्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी प्रत्येकाचा खटाटोप चालू असतो. अशी बरीच प्रकरणे आपण पाहिली असतील. त्यात नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक विद्यार्थी बसच्या मागे लटकून प्रवास करत आहे.
अनेकदा बस किंवा ट्रेनमध्ये प्रवाशांनी खचाखच भरलेल्या गर्दीत उभे राहण्यासाठीही जागा नसते. त्यामुळे बसला लटकून किंवा धावती बस पकडण्याचे जीवावर बेतणारे साहस प्रवासी करताना दिसतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये तरुण बसच्या मागे उभा राहून प्रवास करतोय. मुंबईच्या वांद्रे परिसरातील हा व्हिडीओ असल्याचे सांगण्यात येत आहे. २९ नोव्हेंबरला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये बसला प्रचंड गर्दी असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या गर्दीपासून वाचण्यासाठी या विद्यार्थ्याने हा पर्याय निवडला. आपल्या जीवाची पर्वा न करता हा तरुण प्रवास करताना दिसत आहे. ट्वीटरवर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. अनेक युजर्सनी यावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत