VIDEO : सुमद्र किनारी एन्जॉय करत होते लोक, अचानक पाण्यात येऊ पडलं विमान आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 02:50 PM2023-08-01T14:50:54+5:302023-08-01T14:52:26+5:30

शनिवारी दुपारच्या आसपास झालेल्या या दुर्घटनेत सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. पण पायलटला वाचवण्यासाठी आणि विमान पाण्यातून बाहेर काढण्यासाठी लाइफगार्ड्स धावावं लागलं.

Banner plane crashes into sea in US lifeguards rush to rescue pilot watch video | VIDEO : सुमद्र किनारी एन्जॉय करत होते लोक, अचानक पाण्यात येऊ पडलं विमान आणि मग...

VIDEO : सुमद्र किनारी एन्जॉय करत होते लोक, अचानक पाण्यात येऊ पडलं विमान आणि मग...

googlenewsNext

समुद्र किनाऱ्यावर मस्ती करण्याची मजा वेगळीच असते. काही लोक समुद्र किनारी फिरत होते. अशातच अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायरच्या प्रसिद्ध हॅम्पटन बीचवर एक बॅनर विमान समुद्रात येऊन कोसळलं. शनिवारी दुपारच्या आसपास झालेल्या या दुर्घटनेत सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. पण पायलटला वाचवण्यासाठी आणि विमान पाण्यातून बाहेर काढण्यासाठी लाइफगार्ड्सना धावावं लागलं.

हॅम्पटन पोलीस प्रमुख एलेक्स रेनो यांनी सांगितलं की, WMUR-TV दुर्घटना झाली तेव्हा पायलट एकटाच विमानात होता. ही दुर्घटना कशामुळे झाली याचा शोध घेतला जात आहे. पण प्राथमिक पाहणीनुसार, इंजिनमध्ये बिघाड झाल्याने हे झाल्याचं दिसतं.

रविवारी एबीसी न्यूजने त्यांच्या इन्स्टा अकाउंटवर दुर्घटना आणि बचाव कार्याचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओला आधीच 62 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तसेच लोकांच्या वेगवेगळ्या कमेंट्सही येत आहेत.

लोकांनी आणि हॅम्पशायर बीच पॅट्रोलकडून लाइफगार्ड्सचं कौतुक करण्यात आलं. त्यांनी लिहिलं की, 'आम्हाला आमच्या लाइफगार्ड्सच्या कामावर फार गर्व आहे. विमानाची चाकं पाण्याला स्पर्श करण्यापासून ते पायलटला संपर्क करण्यापर्यंत केवळ 57 सेकंदाचा वेळ लागला'.

Web Title: Banner plane crashes into sea in US lifeguards rush to rescue pilot watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.