बापरे! प्रियकरासह फिरत होती पत्नी, पतीने पाठलाग केला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 06:52 AM2023-07-23T06:52:53+5:302023-07-23T06:53:11+5:30

दिल्लीतील एका मेट्रो स्टेशनवरील व्हिडीओ चर्चेत आहे.

Bapre! Wife was walking with boyfriend, husband chased and... | बापरे! प्रियकरासह फिरत होती पत्नी, पतीने पाठलाग केला अन्...

बापरे! प्रियकरासह फिरत होती पत्नी, पतीने पाठलाग केला अन्...

googlenewsNext

दिल्लीतील एका मेट्रो स्टेशनवरील व्हिडीओ चर्चेत आहे. प्रियकरासह फिरणाऱ्या पत्नीला तिच्या पतीने रंगेहाथ पकडल्याचा दावा केला जात आहे. पाठलाग करणाऱ्या पतीला समोर पाहताच महिला संतापली आणि पतीला शिवीगाळ करत मारहाणीला सुरुवात केली.

व्हिडीओनुसार, बुरारी सुलतानपुरीचा रहिवासी प्रियकरासह फिरणाऱ्या आपल्या पत्नीचा लपून व्हिडीओ बनवित होता. मागून चालताना तो एका व्यक्तीला ‘काका, मला मदत हवी असेल तर कोणाकडून घ्यायची? बघा ही माझी बायको मला सोडून पळाली आणि आता प्रियकरासह हिंडतेय. अनेक दिवसांपासून मी पाठलाग करतोय पण आज पकडले’ असे म्हणतो. पत्नीला फोन कर असे त्याला एकजण सांगतो. मात्र तिने नंबर ब्लॉक केल्याचे उत्तर तो देतो. मग कोणीतरी पत्नीला थांबव असे म्हणते. त्याचवेळी महिला आणि तिचा मित्र एका दुकानाजवळ थांबतात. महिला मागे वळून पतीला बघते आणि गोंधळते. मी व्हिडीओ बनविलाय, आता कोर्टात ये असे पती म्हणतो. घटस्फोट तर मी घेणारच असे पत्नी म्हणते. नंतर दोघांमध्ये मारहाण-शिवीगाळ होते. 

माझ्याशी पळून लग्न केले, पण प्रेमविवाहानंतर माझे आयुष्य नरक बनले आहे, असे म्हणत पती इतरांनाही व्हिडीओ व्हायरल करण्यास सांगतो. नंतर पत्नीला नांगलोई पोलिस स्थानकात घेऊन जातो असेही म्हणतो. आता या व्हिडीओवर लोक कमेंट करत आहेत.

Web Title: Bapre! Wife was walking with boyfriend, husband chased and...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.