VIDEO : किंग कोब्रा आणि घोरपडीची खतरनाक फाईट, बघा कोण जिंकलं कुणाची झाली हवा टाईट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 06:28 PM2021-07-10T18:28:14+5:302021-07-10T18:30:28+5:30

साप आणि मुंगसाच्या लढाईचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, पण तुम्ही कधी साप आणि घोरपडीच्या लढाईचा व्हिडीओ पाहिलाय का?

Battle between king cobra and lizard see what happens next | VIDEO : किंग कोब्रा आणि घोरपडीची खतरनाक फाईट, बघा कोण जिंकलं कुणाची झाली हवा टाईट

VIDEO : किंग कोब्रा आणि घोरपडीची खतरनाक फाईट, बघा कोण जिंकलं कुणाची झाली हवा टाईट

googlenewsNext

जगातला सर्वात विषारी साप कोब्रा जेव्हा त्याच्या शिकारीवर  हल्ला करतो तेव्हा शिकारीला मारूनच शांत होतो. हा साप इतका विषारी असतो की, जर मनुष्याला दंश मारला तर काही मिनिटांमध्येच जीव जाईल. या सापाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक कोब्रा साप आणि घोरपडीच्या फाइटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

साप आणि मुंगसाच्या लढाईचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, पण तुम्ही कधी साप आणि घोरपडीच्या लढाईचा व्हिडीओ पाहिलाय का? जर तुम्ही याआधी कधी असा नजारा पाहिला नसेल तर आता बघा. या व्हिडीओत तुम्हाला साप आणि घोरपडीची खतरनाक लढाई बघायला मिळेल. या लढाईत दोघांपैकी कोण जिंकतं, हे बघून तुम्हीही अवाक् व्हाल. (हे पण बघा : जंगलात फिरताना दिसले वाघ, IAS ने फोटो शेअर करत विचारलं - सांगा फोटोत किती वाघ आहेत?)

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका मैदानात एक कोब्रा साप घोरपडीजवळ बसला आहे. जसा साप हल्ला करतो घोरपडीची हवा निघून जाते. आपला जीव वाचवण्यासाठी घोरपड कोब्रासोबत दोन हात करते. कोब्रा घोरपडीच्या तोंडाजवळ जातो आणि तोंड खाण्याचा प्रयत्न करतो. पण घोरपड जीव वाचवण्यासाठी तिथून पळण्याचा प्रयत्न करते. तेव्हाच कोब्रा घोरपडीला पकडतो. 

अखेर या लढाईत किंग कोब्रा घोरपडीला मात देतो आणि तिचं काम तमाम करतो. घोरपडीला मारल्यानंतर कोब्रा तिला गिळंकृत करतो. हा हैराण करणारा व्हिडीओ क्रुगर सायटिंग्स नावाच्या एका यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यत या व्हिडीओला चार लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
 

Web Title: Battle between king cobra and lizard see what happens next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.