Viral Video: प्राण्यांमधील माणसूकीचे अद्भूत दर्शन, बुडणाऱ्या कावळ्याला वाचवलं अस्वलाने कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 02:26 PM2022-02-14T14:26:26+5:302022-02-14T16:44:39+5:30

आजकाल प्राण्यांमध्येच माणुसकी पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Videos of Animals) होत राहतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एका अस्वलाची माणुसकी पाहायला मिळते.

bear saves crow from drowning emotional video goes viral on social media | Viral Video: प्राण्यांमधील माणसूकीचे अद्भूत दर्शन, बुडणाऱ्या कावळ्याला वाचवलं अस्वलाने कारण...

Viral Video: प्राण्यांमधील माणसूकीचे अद्भूत दर्शन, बुडणाऱ्या कावळ्याला वाचवलं अस्वलाने कारण...

googlenewsNext

जग अतिशय पुढे गेलं आहे. जग चंद्रावर पोहोचलं आहे आणि दुसऱ्या ग्रहांवर मानवी वस्ती बनवण्यासाठी तयारीही करत आहे. मात्र आजही जगात असे अनेक लोक आहेत, जे माणुसकी मात्र शिकलेले नाहीत. रस्त्यावर एखादी व्यक्ती वेदनेत असेल आणि मदत मागत असेल तर लोक मदत करण्याऐवजी व्हिडिओ बनवू लागतात. अशात कोणी कोणाची मदत करेल अशी आशाही करणं सोडून द्यावं लागतं.

मात्र आजकाल प्राण्यांमध्येच माणुसकी पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Videos of Animals) होत राहतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एका अस्वलाची माणुसकी पाहायला मिळते (Bear Saved Life of a Crow).

हे अस्वल पाण्यात बुडणाऱ्या एका कावळ्याला वाचवून माणुसकीचं उत्तम उदाहरण डोळ्यासमोर ठेवतं. अशावेळी एखादा माणूस फक्त डोळ्यांनी सर्व बघण्याचं काम करतो. मात्र अस्वलाने माणुसकी दाखवत जे काही केलं, ते खरंच कौतुकास्पद आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कावळा पाण्यात बुडत आहे. पाण्यातून बाहेर पडण्यासाठी तो प्रयत्न करत आहे. मात्र त्याचे पंख पाण्यात भिजले आहेत. त्यामुळे पाण्यातून बाहेर निघणं त्याला शक्य होत नाही. इतक्यात शेजारीच उभा असलेल्या एका अस्वलाची नजर त्याच्यावर पडते. अस्वल आपल्या पायाच्या आणि तोंडाच्या मदतीने कावळ्याला पाण्यातून बाहेर काढतं. कावळा पाण्यातून बाहेर आल्यानंतर बराच वेळ जमिनीवर पडून राहातो.

आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा व्हि़डिओ आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, अस्वलाने बुडणाऱ्या कावळ्याला वाचवलं...आजकाल माणसांपेक्षा जास्त माणुसकी मुक्या प्राण्यांमध्ये दिसत आहे ना? अवघ्या 46 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत २८ हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी लाईक केला आहे. लोकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Web Title: bear saves crow from drowning emotional video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.