Viral Video : ब्युटी पार्लरच्या भींतीवर लागले होते मॉडल्सचे फोटो, अंधारात काकांनी जाऊन केला कारनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 04:51 PM2022-02-17T16:51:13+5:302022-02-17T16:51:51+5:30

Viral Video : सध्या एक व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

beauty parlour woman posters kissed by old man in cctv video goes viral again | Viral Video : ब्युटी पार्लरच्या भींतीवर लागले होते मॉडल्सचे फोटो, अंधारात काकांनी जाऊन केला कारनामा

Viral Video : ब्युटी पार्लरच्या भींतीवर लागले होते मॉडल्सचे फोटो, अंधारात काकांनी जाऊन केला कारनामा

googlenewsNext

Viral Video : सोशल मीडिया (Social Media) ही खरोखरच अशी एक गोष्ट आहे जिथे कधी आणि काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. फेसबुकवर (Facebook) पुन्हा एकदा एक सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल (Viral CCTV Video) झाला आहे. हा व्हिडीओ २०२० मध्ये एका व्यक्तीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. पण पुन्हा एकदा हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागलाय. यामध्ये एका म्हाताऱ्या काकांचं कृत्य पाहून लोकांना हसायला भाग पाडले आहे. रात्रीच्या अंधारात त्यांचं हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. ब्युटी पार्लरच्या भिंतीवर महिलांचे पोस्टर पाहिल्यावर काकांनी जे कृत्य केलं ते पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

वास्तविक, हा व्हिडीओ फेसबुकवर एका यूजरने शेअर केला आहे. रात्रीच्या अंधारात एका रस्त्यावर समोरून एक काका येत असताना त्यांच्या शेजारी एक ब्युटी पार्लर दिसल्याचे व्हिडीओत दिसत आहे. सुरुवातीला त्यांनी ते ब्युटी पार्लरच्या बाजूने पुढे गेले. पण त्यानंतर लगेचच ते त्या ब्युटी पार्लरकडे परतले आणि त्या पार्लरच्या भिंतीजवळ गेले.

व्हिडीओ पाहणाऱ्यांना ते काका ब्युटी पार्लरच्या भिंतीला लागून पार्क केलेली बाईक घेऊन जातील असं वाटलं. पण ते ब्युटी पार्लरच्या भिंतीकडे पाहू लागले. ब्युटी पार्लरच्या भिंतीवर ओळीतील लावण्यात तीन महिलांचे पोस्टर्स लावण्यात आले होते. त्या काकांनी आधी आजूबाजूला पाहिले आणि नंतर त्या तिन्ही पोस्टर्सवर किस केलं आणि निघून गेले. शेजारी असलेल्या इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये हे कृत्य कैद झालं आहे. सध्या पुन्हा एकदा हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागलाय.

Web Title: beauty parlour woman posters kissed by old man in cctv video goes viral again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.