लग्नाआधी वधू पोहोचली ब्युटी पार्लरमध्ये, ४० हजारांचा मेकअप करून गुपचूप पळून गेली पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 05:41 PM2022-11-03T17:41:51+5:302022-11-03T17:42:20+5:30
लग्नकार्यादरम्यान अनेक गोष्टी घडत असतात. यापूर्वीही लग्नातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. अनेकवेळा वधू आणि वराचे भन्नाट डान्स व्हायरल झाले आहेत.
लग्नकार्यादरम्यान अनेक गोष्टी घडत असतात. यापूर्वीही लग्नातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. अनेकवेळा वधू आणि वराचे भन्नाट डान्स व्हायरल झाले आहेत. असाच एक लग्नातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वधू ब्युटी पार्लरमध्ये गेली आणि लग्नासाठी मेकअप केला. या मेकअपची किंमत ४० हजार रुपयांपेक्षा जास्त होती. पण ही वधू गुपचूप ब्युटी पार्लरमध्ये पैसे न देताच निघून गेल्याचे समोर आले आहे.
चिमुकलीची बघा करामत! मांजरीला शिकवलं ट्रेडमिलवर धावायला, ट्रेडमिलवरचा 'कॅट'वॉक.. व्हायरल व्हिडिओ
अनेक ठिकाणी वधू लग्नमंडपातून पळून गेल्याचे समोर आले आहे, पण येथे वधू ब्युटी पार्लरमधून पळून गेल्याचे समोर आले. ही घटना ब्रिटनमधील यॉर्क शहरातील आहे. एक मुलगी लग्न करणार होती. लग्नाला अजून थोडा वेळ बाकी शिल्लक होता, तरीही तिने मेकअप करण्याचा निर्णय वेळेअगोदरच घेतला होता. तिने एका मैत्रिनीच्या मदतीने मेकअप सेंटरमध्ये पोहोचली आणि मेकअप करून घेतला.
तिने यावेळी तिचा मेकअप चाळीस हजार रुपयांमध्ये करून घेतला,आणि बाजूला बसलेली होती. यावळी संधी मिळताच ती पळून गेली. यावेळी ब्युटी पार्लरमध्ये हा सर्व प्रकार लक्षात आला. ती पैसे न देताच पळून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले.
यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी तरुणीचा शोध सुरू केला. या प्रकरणात, पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मुलीला पकडून तिच्याकडून पैसे वसुल केले असल्याचेही सांगण्यात आले.