फक्त एकाच प्रवाशासाठी धावणाऱ्या बंगळुरूमधील बसची होतेय सर्वत्र चर्चा;  व्हायरल पोस्ट पाहिलीत का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 03:44 PM2023-12-16T15:44:57+5:302023-12-16T15:46:31+5:30

केवळ एका प्रवाशासाठी बंगळुरूच्या रस्त्यांवर धावते बस, नेटकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव.

Bengaluru bus takes daily one passenger from airport and netizens praised the employees video goes viral on social media  | फक्त एकाच प्रवाशासाठी धावणाऱ्या बंगळुरूमधील बसची होतेय सर्वत्र चर्चा;  व्हायरल पोस्ट पाहिलीत का? 

फक्त एकाच प्रवाशासाठी धावणाऱ्या बंगळुरूमधील बसची होतेय सर्वत्र चर्चा;  व्हायरल पोस्ट पाहिलीत का? 

Social Viral : मुंबईसारख्या धावफळीच्या शहरात प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकल ट्रेन्स किंवा बेस्ट बसेस हे समीकरण सर्वश्रुत आहे. भरगर्दीतून वाट काढत कामाच्या ठिकाणी तसेच इतर ठिकाणी जाण्यासाठी मुंबईकर हे पर्याय निवडतात. क्वचितच ऑटो किंवा बसमध्ये प्रवाशांना बसायला सीट मिळणे अवघडच असते. पण याउलट चित्र बंगळुरूमध्ये पाहायला मिळत आहे. फक्त एका प्रवाशासाठी रस्त्यांवर धावणाऱ्या  बंगळुरूमधील एका बसचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बंगळुरूमधील या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 

बंगळुरूमध्ये बीएमटीसीने ( बंगळुरू मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट ) प्रवाशांसाठी 'वायू वज्र'  ही विशेष बससेवा  सुरू केली आहे. केंपेगौडा ते बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा मार्गावरून ही बस धावते. प्रवाशांना ट्रॅफिकच्या जाचातून मुक्त करत आरामदायी प्रवासाचा अनुभव देणे हे बीएमटीसीचे उद्दिष्ट आहे. सध्या ही  बससेवा चर्चेचा विषय बनली आहे. केवळ एका प्रवाशाच्या सेवेत ही बस नित्यनियमाने चालवली जाते. विशेष म्हणजे या बसमधून हा प्रवासी रोज प्रवास करतो. 

सोशल मीडियावर या प्रवासी व्यक्तीने यासंदर्भात माहिती दिली आहे. ट्वीटरवर बस कंडक्टरसह ड्रायव्हरचा फोटो शेअर करत या व्यक्तीने बंगळुरू बससेवेची माहिती दिली.  हे दोघे मला माझ्या घरी सुखरूप पोहचवण्याचे काम करतात. या प्रवासात मला या दोघांची साथ मोलाची ठरते, अशी प्रतिक्रिया या प्रवाशाने दिली आहे. 

दरम्यान, या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. शिवाय हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरल्याचे पाहायला मिळते आहे. 

Web Title: Bengaluru bus takes daily one passenger from airport and netizens praised the employees video goes viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.