मुलाला स्कुटीवरून असे कोणते पालक नेतात? व्हायरल Video पाहून नेटकऱ्यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 01:05 PM2024-04-18T13:05:24+5:302024-04-18T13:08:40+5:30
सोशल मीडियावर एक काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ चर्चेत आलाय.
Social Viral : मुलांना कायद्याचे धडे शिकवणे आणि नियमांचे पालन करणे ही पालकांची जबाबदारी आहे.मात्र, स्वत: च्या जबाबदाऱ्या विसरून पालक आपल्या मुलांना केवळ कायदा मोडायलाच शिकवत नाहीत. तर जीव धोक्यात घालत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन लोक स्कुटीवरून जाताना दिसत आहेत. तर, एक लहान मुलगा देखील त्यांच्यासोबत आहे. तो लहान मुलगा स्कुटरच्या डाव्या बाजुस गार्डवर उभा असल्याचा दिसत आहे. हा व्हिडिओ बंगळूरूमधील असल्याची माहिती समोर येत आहे.
साधारणत: ५ ते ६ वर्ष वय असणारा हा मुलगा स्कुटीच्या डाव्या गार्डवर उभा राहिल्यानं संपूर्ण स्कुटीचे संतुलन बिघडु शकतं. त्याचबरोबर आजुबाजुने येणाऱ्या वाहनांमुळे त्या मुलाला धोका निर्माण होऊ शकतो. या मुलाचं थोडंही संतुलन बिघडलं तर गाडी पलटी होऊ शकते. परिणाम, भयंकर अपघातही घडु शकतो.
Idiots on the road 🤬@blrcitytraffic@BlrCityPolice please take action. pic.twitter.com/tAN9BxTHiS
— 𝗟 𝗼 𝗹 𝗹 𝘂 𝗯 𝗲 𝗲 (@Lollubee) April 15, 2024
या व्हिडिओमध्ये पुरुष स्कुटी चालवतोय तर महिला मागे बॅक सीटवर बसली आहे. शिवाय त्यांच्याबरोबर असलेला लहान मुलगा लेग गार्डवर उभा आहे. या पालकांचं हे कृत्य पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.