हौसेला मोल नाही! बेंगळुरूच्या 'या' व्यक्तीकडे चक्क 20 कोटींचा श्वान, किंमत पाहून नेटकरी चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 05:42 PM2023-01-08T17:42:01+5:302023-01-08T17:49:39+5:30
आपल्याकडे महागड्या किंमतीचे श्वान असतात.श्वानांच्या किंमती दहा हजारापासून ते लाखो रुपयांपर्यंत असतात. सोशल मीडियावर बेंगळुरुमधील एका श्वानाची किंमत चांगलीच व्हायरल झाली आहे.
आपल्याकडे महागड्या किंमतीचे श्वान असतात. श्वानांच्या किंमती दहा हजारापासून ते लाखो रुपयांपर्यंत असतात. सोशल मीडियावर बेंगळुरुमधील एका श्वानाची किंमत चांगलीच व्हायरल झाली आहे. बेंगळुरुमधील एका श्वानाला काही दिवसापूर्वी हैदराबादच्या एका बिल्डरकडून २० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. सतीश एस या व्यक्तीच्या श्वानाला मोठी किंमत आली आहे, पण त्यांनी ही ऑफर नाकारली आहे.त्यांचा आवडता श्वान त्यांनी आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कॉकेशियन शेफर्डच्या या श्वानाचे "कॅडबॉम्स हैदर" असे आहे. हा दुर्मिळ श्वान दीड वर्षाचा असून त्याचे वजन 100 किलोपेक्षा जास्त आहे. सतीश या श्वानाला सिंहनी या नावाने वर्णन करतात. 'या श्वानाचे डोके सुमारे 38 इंच आणि खांद्याची लांबी 34 इंच आहे. या श्वानाचे पाय दोन लिटरच्या पेप्सीच्या बाटलीएवढा मोठा आहे,या श्वानाने त्रिवेंद्रम केनेल क्लब स्पर्धेत भाग घेतला आणि अनेक पुरस्कार जिंकले. सर्वोत्कृष्ट श्वानाच्या या जातीसाठी कॉकेशियन शेफर्डने एकूण 32 पदके जिंकली आहेत. हा श्वान सतीश यांच्या घरी राहतो.
नशेत तर्रर्र असलेल्या बॉयफ्रेंडला खांद्यावर उचलून थेट घरी गेली गर्लफ्रेंड, Video जोरदार व्हायरल
कॉकेशियन शेफर्ड हा एक पशुधन संरक्षक श्वान आहे, जो कॉकेशस प्रदेशातील आहे, हा विशेषत: जॉर्जिया, आर्मेनिया, अझरबैजान, ओसेशिया, सर्केसिया, तुर्की, रशिया आणि दागेस्तान देशात पाहायला मिळतो. भारतात हा श्वान अत्यंत दुर्मिळ आहे.
2016 मध्ये, सतीश यांनी 2 कोटी रुपयांची दोन कोरियन मास्टिफ पिल्ले आणली. "20 वर्षांपासून श्वान पाळण्याची आवड होती. 'मी जगभर शोधले पण मला या जातीचे पिल्ले मिळू शकले नाहीत, असंही ,तीश म्हणाले.