आयडियाची कल्पना! ट्रेनच्या गर्दीत झोपण्यासाठी 'त्याने' केला देसी जुगाड; फोटो तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 03:57 PM2023-02-15T15:57:33+5:302023-02-15T15:58:38+5:30

एका व्यक्तीने ट्रेनच्या गर्दीत बसून चक्क झोपण्यासाठी जुगाड केला आहे.

best jugaad for sleeping in train viral adg uttar pradesh says i have no words for this jugaad | आयडियाची कल्पना! ट्रेनच्या गर्दीत झोपण्यासाठी 'त्याने' केला देसी जुगाड; फोटो तुफान व्हायरल

आयडियाची कल्पना! ट्रेनच्या गर्दीत झोपण्यासाठी 'त्याने' केला देसी जुगाड; फोटो तुफान व्हायरल

googlenewsNext

जुगाड ही एक अद्भुत कला आहे ज्यात भारतीय पारंगत आहेत! होय, समस्या काहीही असो... भारतीय नेहमीच त्यावर उपाय शोधतात. अशीच एक हटके घटना आता समोर आली आहे. एका व्यक्तीने ट्रेनच्या गर्दीत बसूनही चक्क झोपण्यासाठी जुगाड केला आहे. उत्तर प्रदेशच्या एडीजींनी हा फोटो ट्विटरवर शेअर केला होता, त्यानंतर इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. 

अप्रतिम जुगाडचा हा मस्त फोटो बुधवारी @navsekera या ट्विटर युजरने शेअर केला आहे. 'इनक्रेडिबल इंडिया' या हॅशटॅगसह त्यांनी - माझ्याकडे या जुगाडसाठी शब्द नाहीत असं कॅप्शन दिलं आहे. या ट्विटला 37 हजारांहून अधिक लाईक्स आणि दोन हजारांहून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत. तसेच, शेकडो युजर्सनी त्यावर कमेंट केली आहे. 

फोटोमध्ये काही प्रवासी रेल्वेने प्रवास करत असल्याचे दिसून येते. पण त्यातला एक अगदी वेगळ्या पद्धतीने झोपलेला दिसतोय. त्या व्यक्तीने देसी जुगाडने आपलं डोकं खाली पडण्यापासून रोखलं आहे. म्हणजेच जेव्हा आपण बसून झोपायला लागतो तेव्हा आपली मान एका बाजूला पडू लागते. त्यामुळे कधी कधी जोरदार धक्का बसतो आणि माणूस झोपेतून जागा होतो. 

काही वेळा रेल्वेत गर्दीत कोणाचीही मदत घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत या माणसाने असा पराक्रम केला की इंटरनेटवर लोक त्याच्या जुगाडाचे फॅन झाले आहेत. त्याने एका कपड्याने आपलं डोकं खाली पडू नये म्हणून बांधलं आहे. त्याचा हा फोटो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: best jugaad for sleeping in train viral adg uttar pradesh says i have no words for this jugaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.