बाथरूम-किचनमधील नळांवरील डाग दूर करण्याचे सोपे उपाय, लगेच होतील चमकदार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 03:22 PM2024-10-09T15:22:51+5:302024-10-09T15:23:32+5:30
तुम्ही जर नियमितपणे नळांची स्वच्छता केली तर त्यांवर डाग किंवा चिकटपणा वाढत नाही. पण जर तुम्ही स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं तर मग समस्या वाढते.
बाथरूम किंवा किचनमध्ये लावलेले नळांची चमक हळूहळू कमी होत जाते. त्यांवर काळे-पिवळे डाग किंवा चिकटपणा येतो. जास्तीत जास्त बाथरूममधील नळांची ही स्थिती होते. लोक कामापुरती त्यांची स्वच्छता करतात. पण त्यांची हवी तशी स्वच्छता होत नाही. अशात आज आम्ही तुम्हाला नळांच्या तोट्यांवरील डाग, चिकटपणा दूर करणारे उपाय सांगणार आहोत.
तुम्ही जर नियमितपणे नळांची स्वच्छता केली तर त्यांवर डाग किंवा चिकटपणा वाढत नाही. पण जर तुम्ही स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं तर मग समस्या वाढते. अशात तुम्ही काही घरगुती उपाय करून नळ पुन्हा चमकवू शकता.
नळांवरील डाग कसे दूर कराल?
नळांवरील पाण्याचे डाग फारच सामान्य असतात. जे तुम्ही डिटर्जेंटच्या मदतीने दूर करू शकता. नळ पुन्हा चमकदार करण्यासाठी थोड्या पाण्यात डिटर्जेंट पावडर मिक्स करा. आता या पाण्यात स्पंज भिजवा आणि त्याने नळ स्वच्छ करा.
व्हाईट व्हिनेगर
व्हाईट व्हिनेगरमध्ये माइल्ड अॅसिड असतं. हेच कारण आहे की, याने वेगवेगळ्या प्रकारचे डाग दूर करण्यास मदत मिळते. याचा वापर तुम्ही नळांवरील चिव्वट डाग दूर करण्यासाठी करू शकता.
यासाठी तुम्हाला एका वाट्यात व्हाईट व्हिनेगर आणि गरम पाणी समान प्रमाणात घ्यावं लागेल. नंतर ब्रश किंवा स्पंजच्या मदतीने हे मिश्रण नळावर लावा. साधारण अर्धा तास ते तसंच ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने स्वच्छ करा.
बेकिंग सोडा
नळांवर लागलेले डाग दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याची पेस्टही फायदेशीर ठरते. ही तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये १ ते २ चमचे बेकिंग सोडा घ्या आणि त्यात अर्धा ग्लास पाणी टाकून चांगलं मिक्स करा. आता ब्रशच्या मदतीने हे नळांवर काही मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर साध्या पाण्याने नळ धुवून घ्या.
लिंबूने साफ करा नळ
लिंबाचा रस एक नॅचरल क्लीनिंग एजंट आहे. अशात जर किचन किंवा बाथरूममधील नळ काळे पडले असतील तर ते तुम्ही लिंबूच्या मदतीने दूर करू शकता. यासाठी लिंबाचा रस नळावर टाका आणि सालीने घासा. याने डाग दूर होतील.