बाबा, नको ना जाऊ ऑफिसला! पोलीस अधिकारी आणि मुलगा यांचा इमोशनल व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 04:26 PM2019-04-29T16:26:56+5:302019-04-29T16:29:40+5:30
गेल्या शनिवारी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली : गेल्या शनिवारी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पोलीस अधिकारी ऑफिसला जाण्यासाठी निघत असतो. त्यावेळी या पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा त्यांचे पाय धरुन रडतो आणि ऑफिसला जाऊ नका असे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी पोलीस अधिकारी मुलगा सतत सांगत असतो की, 'मी लवकर येईन, मला जाऊ दे.' मात्र, मुलगा मोठ-मोठ्याने रडतो आणि पोलीस अधिकाऱ्याला जाण्यास विरोध करतो.
हा 1.25 सेकंदाचा व्हिडीओ एका आयपीएस अधिकाऱ्याने ट्विटर हॅन्डल @arunbothra वरुन शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करणाऱ्या अधिकाऱ्याने म्हटले आहे, 'पोलीस नोकरीतील ही सर्वात भावूक वेळ आहे. लांब आणि टफ शेड्यूलमधील अधिकाअधिक पोलिसवाल्यांना अशा परिस्थितीतून जावे लागते.' या व्हिडिओवर लोकांनी भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
This is the toughest part of the police job. Due to long and erratic duty hours most of the police officers have to face this situation.
— Arun Bothra (@arunbothra) April 28, 2019
Do watch. pic.twitter.com/aDOVpVZ879
या व्हिडीओत पोलीस अधिकारी ऑफिसला जाण्यासाठी निघत असतो. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा त्यांचे पाय धरुन रडत रडत सांगतो की ऑफिसला जाऊ नका. यावेळी पोलीस अधिकारी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, मुलगा काही हट्ट सोडायला तयार नसल्याचे दिसते. पोलीस अधिकारी मुलाला सतत सांगण्याचा प्रयत्न करतो की, 'मी लवकर येईन, मला जाऊ दे.' मात्र, मुलगा मोठ-मोठ्याने रडतो आणि पोलीस अधिकाऱ्याला शेवटपर्यंत जाऊ नका अशा विनवण्या करतो.
Hats off to the families of our policemen too 🙏🏻
— The-Lying-Lama 2.0 (@KyaUkhaadLega) April 28, 2019
Heart Touching Sir 🙏
— Sudarsan Pattnaik (@sudarsansand) April 28, 2019