सावधान! बॉडी बनवण्याची घाई जीवावर बेतली; 'अशी' अवस्था झाली, फोटो पाहून काटा येईल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 12:57 PM2022-11-28T12:57:25+5:302022-11-28T12:58:01+5:30
मी अजूनही डॉक्टरांकडे जातो जेणेकरून मला या वेदनेतून सुटका मिळेल. या प्रक्रियेच्या प्रत्येक दिवशी २० हजारांपेक्षा जास्त खर्च करावा लागतो असं डेवनं सांगितले.
फिटनेस इंडस्ट्रीमध्ये बॉडी मेंटेन करण्यासाठी किंवा लवकरच मसल्स गेन बनवण्यासाठी स्टेरॉयडचा वापर केला जातो. काहीवेळा त्या स्टेरॉयडचे दुष्परिणाम इतके गंभीर असतात की एखाद्या व्यक्तीच्या जीवावर बेतू शकतं. अलीकडेच एका प्रोफेशनल बॉडीबिल्डरने लवकर बॉडी बनवण्याच्या नादात स्टेरॉयडचं सेवन केले. त्यानंतर त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याच्या पाठीवर फोड आले त्यामुळे त्याला दर आठवड्याला हॉस्पिटलमध्ये जावे लागते, ज्याचा खर्च २०००० रुपयांपेक्षा जास्त आहे. या त्रासामुळे त्याला झोपही येत नव्हती. या बॉडीबिल्डरने एक व्हिडिओ शेअर करत स्वत:चा अनुभव शेअर केला आहे.
कोण आहे हा बॉडीबिल्डर?
स्टेरॉयड घेणाऱ्या व्यक्तीचं नाव डेव हार्ट्रे(Dave Hartrey) जो आयरलँडच्या वॉटरफोर्ड इथं राहणारा आहे. २४ वर्षीय डेवने एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा मी २० वर्षाचा होता तेव्हापासून स्टेरॉयड घ्यायचो. हळूहळू माझ्या अंगावर फोडे यायला, चेहऱ्यावरही डाग दिसायचे. मी नेहमी फिटनेसच्या दृष्टीने काळजी घ्यायचो. वयाच्या १५ व्या वर्षापासून मी व्यायाम करतो. काही वर्षापूर्वी मी एका ट्रेनरच्या देखरेखीत ट्रेनिंग घेतली. त्याच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. त्यानंतर मी प्रोफेशनल बॉडीबिल्डिंगमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. बॉडी बनवण्यासाठी किती वेळ लागतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे मी लवकरच बॉडी व्हावी यासाठी स्टेरॉयड घेण्याचा निर्णय घेतला.
स्टेरॉयडच्या सेवनानंतर काही काळाने माझा टेस्टोस्टेरोन इतकं उच्च पातळीला गेले की त्यामुळे माझी तब्येत बिघडली. शरीरावर काहीतरी जळतंय असं वाटायला लागलं. त्यामुळे मी आता कुणालाही स्टेरॉयडचं सेवन करण्याचा सल्ला देणार नाही. कारण यामुळे माझी काय अवस्था झालीय ते कुणालाही न सांगण्यासारखी आहे असं डेवनं म्हटलं.
दरम्यान, मला २०२० मध्ये पहिल्यांदा पुरळ आलं होतं, ज्यामुळे माझ्या पाठीवर फोडे आणि पुरळ उठले होते. स्टेरॉयडच्या सेवनामुळे माझ्या पाठीला, हाताला, तोंडाला सगळीकडे फोड्या आल्या. मी दिवसेंदिवस स्वत:ला दोषी समजायचो. माझ्यासाठी हे खूप वेदनादायक होते कारण माझ्या शरीरातील फोडांमुळे खूप वेदना होत होत्या. मी शेवटी स्टेरॉयड घेणे बंद केले आणि नऊ महिने होम क्वारंटाईन झालो. माझी संपूर्ण पाठ जखमांनी भरलेली होती या जखमेचं कारण म्हणजे स्टेरॉयड घेतल्यामुळे आलेल्या फोड्या फुटल्या होत्या. मला बरे होण्यासाठी नऊ महिने लागले. पण तरीही पाठीवर आणि हातावर फोडांच्या खुणा आहेत. मी अजूनही डॉक्टरांकडे जातो जेणेकरून मला या वेदनेतून सुटका मिळेल. या प्रक्रियेच्या प्रत्येक दिवशी २० हजारांपेक्षा जास्त खर्च करावा लागतो असं डेवनं सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"