VIDEO : सीमेवर फिरत होते भारतीय; भूतानचा पोलीस दुरूनच ओरडला, 'पाणी प्या आणि निघून जा'...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 01:55 PM2021-01-08T13:55:21+5:302021-01-08T13:58:35+5:30
हा व्हिडीओ फेसबुक पेजवर जेलीफू न्यूज अॅन्ड बिझनेस फोरम द्वारे शेअर करण्यात आला आहे. लोक या भूतानच्या पोलिसाचं कौतुक करत आहेत.
भूतानच्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सीमेवर काही भारतीय फिरत होते. त्याने पोलिसाने खूप प्रेमाने त्यांना समजावलं आणि घरी परत जाण्याची विनंती केली. त्याने भूतानमधील कोरोनाची स्थिती सांगितली आणि तेथून जाण्यास सांगितले. हा व्हिडीओ फेसबुक पेजवर जेलीफू न्यूज अॅन्ड बिझनेस फोरम द्वारे शेअर करण्यात आला आहे. लोक या भूतानच्या पोलिसाचं कौतुक करत आहेत.
व्हिडीओत पोलीस भारतीयांना हिंदी भाषेत सांगत आहे की, बॉर्डर रिकामी करा आणि परत तुमच्या देशात जा. या व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिले आहे की, 'आमच्या सीमावर्ती भागात भारतीय मित्रांना शांततापूर्ण पद्धतीने संदेश दिला. हे लोक भूतानमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होत'. व्हिडीओत पोलीस या लोकांना फार प्रेमाने घरी परतण्याचा संदेश देत आहे. तो असंही म्हणतोय की, 'भूतानचं पाणी प्या आणि आपापल्या घरी परत जा'.
पोलीस भारतीय लोकांना विनम्रतापूर्वक आपल्या चेहऱ्या हात ठेवण्यास आणि सुरू असलेल्या महामारी दरम्यान घरातच राहण्याची विनंती करताना दिसतो आहे. रात्र होत असल्याने त्याने या लोकांना लवकरात लवकर बॉर्डर सोडण्याची विनंती केली आहे. हे सगळे लोक सीमेवरील नदीच्या त्या बाजूला आणि पोलीस नदीच्या या बाजूला आहे.
भूतानमध्ये कोविड १९ च्या केसेस वाढल्यानंतर पंतप्रधान लोटे त्सेरिंग यांनी २३ डिसेंबरपासून देशात सात दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊन नव्या वर्षात वाढवण्यात आला आहे. सध्या भूतानमध्ये कोविड -१९ च्या ७३४ केसेस आहेत.