...तेव्हा फक्त 18 रुपयांत मिळत होती सायकल, बिलाचा एक फोटो होतोय व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 12:20 PM2023-01-14T12:20:32+5:302023-01-14T12:23:15+5:30
सध्याच्या काळात लहान मुलांसाठी विकत घेतलेल्या सायकलही 5 ते 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळत नाहीत.
नवी दिल्ली : आधुनिक काळात तरुणांमध्ये बाइकची क्रेझ पाहायला मिळते. पण, लहानपणी प्रत्येकाला सायकल चालवायला नक्कीच मिळते. सायकल चालवायला सगळ्यांनाच आवडते. सध्याच्या काळात लहान मुलांसाठी विकत घेतलेल्या सायकलही 5 ते 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळत नाहीत.
सध्या सोशल मीडियावर एका फोटो वेगाने युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. जे पाहून वडिलधारी आपल्या जुन्या काळात हरवून जात आहेत. तर तरुण सर्वात आश्चर्य व्यक्त करत आहेत. दरम्यान, जवळपास 90 वर्षे जुने एक बिल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका सायकलची किंमत 18 रुपये सांगितली जात आहे.
या बिलाचा फोटो संजय खरे यांनी सोशल मीडियावर फेसबुकवर पोस्ट केला आहे. हे शेअर करण्यासोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, "एकेकाळी 'सायकल' हे माझ्या आजोबांचे स्वप्न राहिले असेल. सायकलच्या चाकाप्रमाणे काळाचे चाक किती फिरले!".
दरम्यान, हे बिल कोलकाता येथील एका सायकल दुकानाचे आहे. ज्यामध्ये 1934 साली विकल्या गेलेल्या सायकलची किंमत पाहून सगळेच थक्क झाले आहेत. 90 वर्षांपूर्वी एका सायकलची किंमत 18 रुपये होती, असे फोटोत पाहायला मिळते.
जुने बिल पाहून युजर्स आश्चर्यचिकत!
फोटोत पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील माणिकतला येथील एका सायकल दुकानाचे नाव 'कुमुद सायकल वर्क्स' असे दिसत आहे. सोशल मीडियावर दिसल्यानंतर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जे पाहून सर्वच आश्चर्य व्यक्त करत आहेत. तसेच, एका यूजरने आपले जुने दिवस आठवत कमेंट केली आहे की, "मी 1977 मध्ये इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, तेव्हा मी 325 रुपयांना सायकल घेतली होती."