रात्री प्रेयसीला भेटायला गेला, घरच्यांनी पाहिल्यावर विहिरीत उडी मारली, बाहेर काढले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 09:03 PM2022-12-12T21:03:28+5:302022-12-12T21:03:58+5:30
बिहारमधील सारण जिल्ह्यातील एका गावात ९ डिसेंबर रोजी २ वाजण्याच्या सुमारास एक तरुण विहिरीत पडल्याचे आढळून आले. गावकऱ्यांनी त्याला विहिरीतून बाहेर काढले आणि त्यानंतर त्याचे लग्न लावून दिले.
बिहारमधील सारण जिल्ह्यातील एका गावात ९ डिसेंबर रोजी २ वाजण्याच्या सुमारास एक तरुण विहिरीत पडल्याचे आढळून आले. गावकऱ्यांनी त्याला विहिरीतून बाहेर काढले आणि त्यानंतर त्याचे लग्न लावून दिले. सध्या परिसरात तरुणाला विहिरीतून बाहेर काढल्याचा व्हिडिओ आणि त्याच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडले असतील मुलाला विहिरीतून बाहेर काढून लग्न का केले? आणि मुलगा विहिरीत कसा पडला? अजून एक गोष्ट सांगतो त्या मुलाने स्वतः विहिरीत उडी मारली होती.
ही घटना बिहार येथील सारणच्या गारखा उपविभागातील मोतीराजपूर गावातील आहे. सारणच्या छपरा शहरातील मुन्ना राज हा मोतीराजपूर गावातील एका तरुणीला तिच्या घरी भेटण्यासाठी गेला होता. शुक्रवार, 9 डिसेंबर दुपारी 2 वा. मात्र यादरम्यान तरुणीच्या कुटुंबीयांना जाग आली. त्यांच्यापासून वाचण्यासाठी मुन्ना राजने विहिरीत उडी घेतली.
मुन्ना राजने विहिरीत उडी मारताच आरडाओरडा झाला. गावकरीही जागे झाले. विहिरीत एक तरुण पडल्याचे पाहिले. गावकऱ्यांनी या तरुणाला बोहेर काढण्याचा प्रयत्न केले आणि मग मुन्ना राजला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. यानंतर ग्रामस्थांची विचारपूस सुरू झाली. तरुणाने सर्व गोष्ट गावकऱ्यांना सांगितले.
मुन्ना राज आणि तरुणी गेल्या ४ वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आहेत. मात्र मुन्ना राजचे कुटुंबीय लग्नासाठी तयार होत नव्हते. दरम्यान, रात्री मुन्ना राज तरुणीला भेटण्यासाठी आला. मात्र तरुणीच्या कुटुंबापासून वाचण्यासाठी स्वत: विहिरीत उडी घेतली.
Skating Viral Video: रस्त्यावर तरूण करत होता स्केटिंग, अचानक कारचा दरवाजा उघडला अन्...
गावकऱ्यांनी मुन्ना राजला विहिरीतून बाहेर काढले आणि त्यानंतर पंचायत झाली. मुन्ना राज आणि तरुणीची इच्छा विचारण्यात आली. दोघेही लग्नासाठी तयार झाले. त्यानंतर गावातील मंदिरात त्यांचा विवाह झाला.