महिला ओरडत होती, तरी गुंड लाजले नाहीत; बिहारमधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 08:38 AM2021-10-07T08:38:30+5:302021-10-07T08:44:27+5:30
हा व्हिडिओ युवक राष्ट्रीय जनता दलाचे प्रसार माध्यम प्रभारी अरुण कुमार यादव यांनी शेअर केला.
छपरा (बिहार) : छपरामध्ये महिलेची छेडछाड केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बाइकच्या मागे बसलेल्या महिलेला काही लोक असभ्यरीत्या स्पर्श करीत असल्याचे व महिला खूप घाबरलेली दिसते. व्हिडिओ दरियापूर पोलीस ठाण्याच्या दरियापूर रेल्वे कारखान्यापासून दरिहरा सरैया गावाला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील आहे. व्हिडिओत महिला ओरडत असून काही लोक तिच्याशी अश्लील वर्तन करताना दिसतात.
हा व्हिडिओ युवक राष्ट्रीय जनता दलाचे प्रसार माध्यम प्रभारी अरुण कुमार यादव यांनी शेअर केला. त्यांनी लिहिले की, ‘छपरा जिल्ह्यातील ही अमानवीय घटना आहे. राज्यात नितीश-भाजप युतीचे १५ वर्षांपासून सरकार आहे. नितीश सरकारसाठी ही काही नवी घटना नाही. राज्यात रोज अशा घटना कोणाची भीती न बाळगता केल्या जातात.’ दोन आठवड्यांपूर्वी दुचाकीवर जात असलेली महिला व तिच्या प्रियकराला काही लोकांनी जंगलात पकडले होते. आधी विचारपूस केली. नंतर त्या लोकांनी महिलेला त्रास द्यायला सुरुवात केली. तिच्या प्रियकराला मारहाण केली. बरीच विनंती केल्यानंतर प्रियकर तिला बाइकवर बसवून तेथून निघून गेला.
बिहार के जिला छपरा की यह अमानवीय घटना है। बिहार में नीतीश-भाजपा गठबंधन की 15 वर्षों से सरकार है।
— Arun Kumar Yadav (@Arunrjd) October 6, 2021
नीतीश सरकार में यह कोई नई घटनाएं नहीं है, प्रदेश में रोज इस तरह की घटनाओं को बेखौफ अपराधी अंजाम देते हैं।
नीतीश सरकार महिलाओं की रक्षा करने में पूरी तरह विफल.. शर्म करो सरकार। pic.twitter.com/UPg9TfAN93
आरोपींची ओळख पटली
दरम्यान, महिलेला त्रास देणाऱ्या एकाने व्हिडिओ बनवला. या प्रकरणी पोलीस अधीक्षक संतोष कुमार म्हणाले की, ‘या घटनेबद्दल समजल्यावर पोलिसांच्या तुकड्या बनवून घटनेची माहिती घेण्यात आली. व्हिडिओतील सर्व ६ जणांना ओळखण्यात आले असून ३ जणांना अटक झाली आहे.’