पायलट होता आलं नाही म्हणून पठ्ठ्याने गाडीचंच केलं हेलिकॉप्टर; व्हिडीओ झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 04:11 PM2019-08-07T16:11:37+5:302019-08-07T16:13:11+5:30
एका व्यक्ती एक स्वप्न पाहिलं, पण काही कारणांमुळे तो ते पूर्ण करू शकला नाही. पण त्याने हार मानली नाही. त्याने स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोडासा हटके मार्ग शोधून काढला, पण स्वप्न पूर्ण केलं.
आपण सर्वच आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत असतो. अनेकदा स्वप्न पूर्ण करता न आल्यामुळे आपण सोडून देता. पण आपल्याकडे अशाही काही व्यक्ती आहेत, ज्या आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करायला तयार असतात. अशाच एका व्यक्ती एक स्वप्न पाहिलं, पण काही कारणांमुळे तो ते पूर्ण करू शकला नाही. पण त्याने हार मानली नाही. त्याने स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोडासा हटके मार्ग शोधून काढला, पण स्वप्न पूर्ण केलं.
बिहारमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला लहानपणापासूनच पायलट होण्याची इच्छा होती. परंतु, काही कारणांमुळे तो आपलं हे स्वप्न पूर्ण करू शकला नाही. पण त्याने हार मानली नाही. या पठ्याने आपल्या गाडीलाच हेलिकॉप्टरचं रूप दिलं.
या व्यक्तीकडे टाटा नॅनो ही कार होती. त्याने आपलं डोकं लावून तिला हेलिकॉप्टरचं लूक दिलं. त्यासाठी त्याने गाडीवर हेलिकॉप्टरप्रमाणे पंखा लावला. तसेच गाडीच्या मागील आणि पुढील भागही बदलला. एवढचं नाहीतर त्याने कारच्या आतील इंटिरिअरही हेलिकॉप्टप्रमाणे केलं.
गाडीच्या आतमध्ये त्याने हेलिकॉप्टरच्या आत असणाऱ्या बटणांप्रमाणे बटन लावले. गाडीसुद्धा बटणावरच सुरू होते. तसेच गाडीवर लावण्यात आलेले पंखेही चालू होतात. या व्यक्तीने तयार केलल्या चॉपरचं जगभरात कौतुक करण्यात येत आहे. या व्यक्तीचं नाव मिथलेश प्रकाश असं आहे.
खरं तर मिथलेश्या इंजिनिअरिंग स्किल्सचं फार कौतुक केलं जात आहे. तसेच त्याने केलेल्या या भन्नाट कल्पनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गाडीला मिथलेशने हेलिकॉप्टरप्रमाणे लूक दिला असला तरिही ती उडू शकत नाही.