पठ्ठ्यानं राहतं घर एका जागेवरून दुसऱ्या जागी केलं शिफ्ट;  'Home Delivery' चा अद्भूत प्रयोग पाहून नेटकरी चक्रावले 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 12:25 PM2023-12-29T12:25:15+5:302023-12-29T12:26:23+5:30

सध्या सोशल मीडियावर बिहारच्या तरुणाने केलेला जुगाड चर्चेत आहे.

Bihar young guy shifted her own house by using crane one place to another video goes viral on social media  | पठ्ठ्यानं राहतं घर एका जागेवरून दुसऱ्या जागी केलं शिफ्ट;  'Home Delivery' चा अद्भूत प्रयोग पाहून नेटकरी चक्रावले 

पठ्ठ्यानं राहतं घर एका जागेवरून दुसऱ्या जागी केलं शिफ्ट;  'Home Delivery' चा अद्भूत प्रयोग पाहून नेटकरी चक्रावले 

Viral Video :सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. कधी नेटकऱ्यांचे निखळ मनोरंजन करणारे व्हिडीओ समोर येतात. तर कधी व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण होतात. असाच एक व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही चक्रावून जाल एवढं मात्र नक्की!

जगामध्ये अशक्य असं काहीच नाही, असं म्हटलं जातं. मनामध्ये जिद्द आणि मेहनतीला प्रयत्नांची जोड असेल अशक्य गोष्टी ही सहज शक्य होतात. याची प्रचिती हा व्हायरल व्हिडीओ पाहून येते. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी झाडांना त्यांच्या मुळासकट उपटून काढल्याचे पाहिले असेल. किंवा भलेमोठे डोंगर  क्रेनच्या साहाय्याने पोखरलेले पाहिले असेलच. याच्या उलट प्रकार बिहारमध्ये घडलाय.  या व्हायरल व्हिडीओमधील तरुणाने केलेला जुगाड तुमच्या आकलनापलीकडे आहे. या पठ्ठ्याने चक्क त्याचं राहतं घर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलंय. क्रेनच्या साहाय्याने या तरुणाने त्याचं घर उचलून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेलं. या पठ्ठ्याचा हा जुगाड नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. 

हा व्हायरल व्हिडीओ एक्सवर शेअर करण्यात आलेला आहे. शिवाय या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कमेंट्सचा वर्षाव केलाय. साधारणत २२ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया यावर येत आहेत. अशा घटना परदेशात झाल्याचं पाहिलं आहे पण भारतामध्ये सुद्धा असं घडतंय, हे पाहून वाटतंय की आपला भारत देश बदलतोय. अशी कमेंट या नेटकऱ्याने दिली आहे. 

पाहा व्हिडीओ - 

Web Title: Bihar young guy shifted her own house by using crane one place to another video goes viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.