स्टंटच्या नादात बाईकच्या चिंधड्या उडाल्या; १० सेकंदाचा Video पाहून अंगावर काटा येईल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 04:10 PM2021-11-04T16:10:36+5:302021-11-04T16:12:25+5:30
हा व्हिडीओ बाईकच्या मागे असलेल्या एका कारमधील व्यक्तीने त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे.
अतिघाई संकटात नेई, वेगावर नियंत्रण ठेवा अन् अपघात टाळा अशा विविध सूचना आपण नेहमीच कुठल्याही महामार्गावरुन जाताना दिसत असतात. वेगानं गाडी चालवून जीव धोक्यात घालू नका असं वारंवार सांगितलं जातं. पण या सूचनांकडे सर्रासपणे दुर्लक्ष करणाऱ्यांची संख्या भारतात काही कमी नाही. गाडीचा वेग नियंत्रणात न आल्याने भीषण अपघात घडतात.
वेगाने गाडी चालवणं हे केवळ त्या चालकाच्या जीवासाठी धोकादायक नसतं तर रस्त्याने जाणाऱ्या इतरांसाठीही ते प्राणघातक ठरू शकतं. काही स्टंटमॅन स्वत:चा जीव धोक्यात घालून बाईकवर स्टंट करत असतात. टिकटॉक किंवा अन्य माध्यमात व्हिडीओ व्हायरल होण्यासाठी स्टंट करण्याच्या नादात अनेकांना जीव गमावावाही लागला आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक बाईकचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात दुचाकीस्वाराला स्टंट करताना ते महागात पडलं आहे.
हा व्हिडीओ बाईकच्या मागे असलेल्या एका कारमधील व्यक्तीने त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओत बाईकस्वार आवश्यक उपकरणासह हेल्मेटवर लावलेल्या गोपरो कॅमेरासह बाईक चालवताना दिसतो. दोन्ही बाजूने वाहतूक सुरु असणाऱ्या रस्त्यावर कुठलाही विभाजक नसतो. वेगात असलेला बाईकस्वार जेव्हा स्टंट करण्यासाठी बाईकचे पुढील चाक हवेत उचलत वेगात गाडी चालवतो तेव्हा त्याचं नियंत्रण सुटतं आणि तो थेट विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला जाऊन जोरात आदळतो. हा अपघात इतका भीषण होता की, यात बाईकच्या चिंधड्या उडाल्या आणि दुचाकीस्वार अपघातात बळी गेला.
#BeSafe💐
— Rupin Sharma IPS (@rupin1992) October 27, 2021
ऐसा मत करना😢😢😢😢
Hero की Heropanti nikal gayi 😢😢😢@ipskabra@arunbothra@ipsvijrkpic.twitter.com/fHZ2mo7Rgb
IPS अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडीओ
हा व्हिडीओ एका आयपीएस अधिकाऱ्याने शेअर केला आहे. त्यात दुचाकीस्वार बाईकचं पुढील चाक हवेत उचलण्याचा प्रयत्न करतो. हे पहिल्यांदाच नाही तर अशाप्रकारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतात. परंतु हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल. IPS अधिकारी रुपीन शर्मा यांनी त्यांच्या अधिकृत हँडवर हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, सुरक्षित राहा, असं करू नका. हिरोची हिरोपंती निघाली. हा व्हिडीओ ५ हजाराहून जास्त लोकांनी पाहिला असून अनेक जण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.