बाईक खोल दरीत कोसळणारच होती इतक्यात...ओव्हरटेक करणं पडलं महागात!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 03:52 PM2021-11-18T15:52:41+5:302021-11-18T20:53:50+5:30
आम्ही बोलत आहोत, हिमालयातील रस्त्यांबद्दल. त्यामुळे अशा रस्त्यांवरच मस्ती करणं भल्याभल्यांच्याही अंगाशी येऊ शकतं. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यात एक दुचाकीस्वाराने जरा ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, आणि हे काम त्याच्या जीवावर बेतता बेतता राहिलं.
कितीही रस्ते अपघात झाले तरी चालक रस्त्यावर मस्ती करण्याचं थांबत नाहीत. बऱ्याचदा अपघात होतात, पण त्यात कुणाला काही होत नाही. पण आपल्याकडे असेही काही भाग आहे, जिथल्या रस्त्यांवर तुमची गाडी थोडीजरी हलली तर मृत्यू निश्चित आहे. अहो इथं गाडीला ओव्हरटेक करणंही मृत्यूचा दाढेत जाण्याचं कारण ठरु शकतं. आम्ही बोलत आहोत, हिमालयातील रस्त्यांबद्दल. त्यामुळे अशा रस्त्यांवरच मस्ती करणं भल्याभल्यांच्याही अंगाशी येऊ शकतं. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यात एक दुचाकीस्वाराने जरा ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, आणि हे काम त्याच्या जीवावर बेतता बेतता राहिलं.
व्हिडिओमध्ये एक दुचाकीस्वार रस्त्यावरून जाणाऱ्या मालाने भरलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र अचानक दुचाकीस्वाराला असे काही घडते, ज्यामुळे त्याचा तोल बिघडतो आणि दुचाकीसह लोक दरीच्या दिशेने घसरतो. या घटनेत तो थोडक्यात बचावला, कारण त्याची बाईक आणखी थोडी घसरली तर तो खोल दरीत कोसळला असता, त्यानंतर त्याचा जीव वाचवणे अशक्य होते.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन दुचाकीस्वार एका निसरड्या रस्त्यावरून मोटारसायकलवरून सामान घेऊन जाताना दिसत आहेत आणि दोन ट्रक त्यांच्या समोरून जाताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, पाऊस आणि बर्फामुळे रस्त्यावर चिखल झाला आहे, तरीही एक दुचाकीस्वार ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो, पण नंतर त्याची दुचाकी घसरायला लागते आणि अशा परिस्थितीत त्याचं नशीब त्याला साथ देतं आणि ती मागचा दुचाकीस्वारही त्याच्या मदतीला येतो. त्यामुळे त्याचा जीव थोडक्यात वाचतो.
हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल हॉग नावाच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करण्यात आला आहे. जो वृत्त लिहिपर्यंत 18 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओवर लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांना ‘फायनल डेस्टिनेशन’ चित्रपटाची आठवण झाली, तर अनेक युजर्सनी कमेंट करून अशा वाटांवर चालताना खबरदारी घ्यायला हवी असे सांगितले. कारण एक छोटीशी चूक तुमचा जीव घेऊ शकते!