वाईट सवयीमुळं उद्ध्वस्त झालं आयुष्य; अब्जाधीशालाही बनवलं कंगाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 05:55 PM2022-01-25T17:55:00+5:302022-01-25T17:55:48+5:30
मागील १ वर्षात त्यांच्या जीवनाला यू-टर्न मिळाला. हसतं खेळतं कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडलं
ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला बिझनेसमध्ये नुकसान झाल्यानंतर दारुचं व्यसन जडलं आणि त्यानंतर जे घडलं ते ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. या माणसाकडे राहायलाही घर नव्हतं. २० वर्षापूर्वी ५५ वर्षीय एंड्रयू बेलीथ हे एक यशस्वी बिझनेसमॅन होते. त्यांचं इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंगचा व्यवसाय होता. वर्षाकाठी १ अरबपेक्षा जास्त त्यांची कमाई होती.
मागील १ वर्षात त्यांच्या जीवनाला यू-टर्न मिळाला. हसतं खेळतं कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडलं. बिझनेसमध्ये झालेल्या तोट्यानंतर दारु आणि ड्रग्स इतकं वाईट सवय जडली की त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर झालेला दिसला. मिररच्या बातमीनुसार, २०१८ मध्ये जेव्हा एंड्रयू सुट्टी एन्जॉय करण्यासाठी क्रोएशियाला गेले होते. तेव्हा त्यांच्या बिझनेसमध्ये मोठा फटका बसला. त्यांच्या कंपनीकडून मोठ्य रक्कमेचं कॉन्ट्रॅक्ट गेले.
बिझनेसमध्ये नुकसान झालं आणि त्याचवेळी पत्नीला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं निष्पन्न झालं. त्यांची आईलाही स्ट्रोकचा आजार आहे. त्यात त्यांच्या जिवलग मित्राने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. इतकचं नाही तर एंड्रयूचा मुलगाही ठीक नव्हता. त्याला हार्ट आणि लिवरसंबंधात अनेक समस्या जाणवत होत्या. एंड्रयूने सांगितले की, मी त्यावेळी पत्नीसोबत नव्हतो. घरच्यांवर लक्ष ठेवण्याऐवजी मी बिझनेसवर लक्ष केंद्रीत केले. पत्नीला हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकलो नाही. मी तेव्हा खूप खचलो होतो. कारण माझ्याकडे पैसे खूप होते परंतु बिझनेसमुळे पत्नीची देखभाल करु शकत नव्हतो.
या सर्व टेन्शनमध्ये एंड्रयूला दारु आणि ड्रग्सचं व्यसन लागलं. ताण घालवण्यासाठी ते जास्तवेळ ऑफिसमध्ये राहू लागले. आठवड्याचे ७० तास ते ऑफिसमध्ये होते. ऑफिसमध्ये एक बेडरुम बनवला होता. मी खूप वेळ तिथेच राहणे पसंत करत होतो. मला दारु आणि ड्रग्सचं व्यसन लागलं हे घरच्यांना कळायला नको म्हणून मी ऑफिसमध्येच राहत होतो. मी काही काळाने सुधारेन असं मला वाटलं होतं असं एंड्रयू म्हणाले.
एकेदिवशी कुणालाही न सांगता एंड्रयू एका टूरला निघून गेले. त्यांनी फोनही स्विच ऑफ ठेवला. त्यावेळी त्यांच्याकडे जे पैसे होते ते खर्च झाले. घरी परतण्यासाठी त्यांच्याकडे केवळ दोन बॅगा आणि कपडे याशिवाय काही नव्हतं. एंड्रयू म्हणाले की, मला परत येण्यासाठी कुणाला मदतीचा फोन करणंही लाजिरवाणं वाटतं होतं. एकेदिवशी सिटिजन्स एडवाइस यांच्याकडे गेलो आणि त्यांना हे सगळं सांगितले. त्यानंतर त्यांनी मला काही पैसे दिले. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर माझं आयुष्य पुन्हा रुळावर आलं आहे. मागील २ वर्षात मी आधीपेक्षाही जास्त कमवले आहे. मात्र वाईट काळाला कधी विसरत नाही ज्यावेळेला मी मानसिक तणावाखाली गेलो होतो.