'ही' व्यक्ती फेडणार विद्यार्थ्यांचं २७९ कोटी रूपयांचं कर्ज, घोषणा करताच विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 03:24 PM2019-05-21T15:24:46+5:302019-05-21T15:28:02+5:30
भारताप्रमाणेच अमेरिकेतही उच्च शिक्षणासाठी एज्युकेशन लोनही जास्त घ्यावं लागतं. त्यामुळे विद्यार्थ्यांची लोन फेडता फेडता पळता भुई होते.
भारताप्रमाणेच अमेरिकेतही उच्च शिक्षणासाठी एज्युकेशन लोनही जास्त घ्यावं लागतं. त्यामुळे विद्यार्थ्यांची लोन फेडता फेडता पळता भुई होते. अशात त्यांच्या मदतीसाठी एक अरबपती व्यक्ती धावून आली आहे. रॉबर्ट एफ. स्मिथ असं या अरबपती व्यक्तीचं नाव आहे. त्यांनी नुकताच एका क्लासमधील सर्व विद्यार्थ्यांचं लोन स्वत: फेडणार अशी घोषणा केली. या सर्वांचं लोन ४० मिलियन डॉलर, भारतीय करन्सीमध्ये २७९ कोटी रूपये इतकं होतं.
रॉबर्ट हे डॉक्टरेट मानद पदवी घेण्यासाठी Morehouse College गेले होते. तिथे त्यांनी घोषणा केली की, ते क्लासमधील ४०० विद्यार्थ्यांचं लोन फेडतील. याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. ते म्हणाले की, 'माझ्या परिवाराची ८वी पिढी या देशात आहे. आता आम्हाला तुमची थोडी मदत करायची आहे. हा माझा क्लास आहे. माझं कुटुंबाची या विद्यार्थ्यांचं पूर्ण लोन फेडण्याची इच्छा आहे'.
Right after @RFS_Vista tells the Class of 2019 he will cover their student loans #MorehouseGrad2019#MVP @Morehouse pic.twitter.com/wMD1DfOTfT
— José Mallabo (@JoseMallabo) May 19, 2019
रॉबर्ट एफ. स्मिथ Vista Equity Partners नावाच्या कंपनीचे फाउंडर आहेत. ही कंपनी सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते. फोर्ब्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती ५ बिलियन डॉलर इतकी आहे. ते दानशूर आहेत. ते लोकांची मदत करण्यासाठी नेहमीच पुढे असतात.
Wow! Billionaire Robert F. Smith surprises @Morehouse graduates by announcing this morning his family will eliminate the student debt of the entire class of 2019 with a grant. #PayItForward#HBCUpic.twitter.com/BPEDBdqryu
— Marcus Smith (@MarcusSmithKTLA) May 19, 2019
२२ वर्षाचा Aaron Mitchom सांगतो की, 'मी धक्का बसला. जेव्हा त्यांनी लोन फेडण्याची घोषणा केली तेव्हा आम्ही सगळेजण रडत होतो. आमच्यावरील किती मोठं ओझं दूर झालं होतं'.