आपल्या बांधवाला निरोप देताना पक्ष्याने जे केलं ते पाहुन तुम्हाला अश्रु होतील अनावर, पाहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 05:34 PM2022-05-04T17:34:55+5:302022-05-04T17:39:54+5:30
आपल्या साथीदाराला गमावणाऱ्या एका पक्ष्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. साथीदाराच्या मृत्यूनंतर त्याच्याजवळ बसून रडणाऱ्या या पक्ष्याचा व्हिडीओ पाहून सर्वजण भावुक झाले आहेत.
माणूस जसा बोलून आपल्या भावना व्यक्त करू शकतो तसं प्राणी करू शकत नाहीत. कारण त्यांना बोलताच येत नाही. शब्दांची भाषा न येणारे हे मुके जीव प्रेम, निष्ठा आणि संवेदनशीलता याबाबत मात्र माणसापेक्षा दोन पावलं पुढंच असतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशाच एका मुक्या जीवाच्या संवेदनशीलतेचं दर्शन घडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आपल्या प्रिय साथीदाराला गमावण्याचं दुःख होतंच. अशाच आपल्या साथीदाराला गमावणाऱ्या एका पक्ष्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. साथीदाराच्या मृत्यूनंतर त्याच्याजवळ बसून रडणाऱ्या या पक्ष्याचा व्हिडीओ पाहून सर्वजण भावुक झाले आहेत. हा व्हिडीओ जुना आहे. पण तो आता पुन्हा व्हायरल होतो आहे.
व्हिडीओत पाहू शकता रस्त्यावर हे दोन पक्षी आहेत. त्यातील एक मृत आहे. जिवंत पक्षी आपल्या या जमिनीवर पडलेल्या साथीदाराकडे जातो. त्याला आपल्या चोचीने उठवण्याचा प्रयत्न करतो. कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने, तो त्याला हलवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. अनेक प्रयत्न केल्यानंतरही जेव्हा तो उठत नाही, तेव्हा त्याची खात्री पटते की तो जिवंत नाही. त्याचा जोडीदार या जगात नाही यावर त्याचा जणू विश्वासच बसत नाही आहे, असं त्याची ती कृती बघून वाटतं.
नंतर अनेक पक्षी तिथं जमलेले दिसतात. आपल्या मित्राला अंतिम निरोप देण्यासाठी आलेले दिसत असून, जणू माणसांप्रमाणे तेही शोकसभा घेत आहेत, असं हे दृश्य बघून वाटतं. या पक्ष्यांचं आपापसातलं प्रेम, विरहानं व्याकुळ झालेल्या दुसऱ्या पक्ष्याचा विलाप मन हेलावून टाकतं.
Australian Galah, also known as the pink and grey cockatoo, mates for life. Partner grieving at the death of its mate...
— Susanta Nanda IFS (@susantananda3) July 4, 2021
The farewell at the end(0.45sec) will break ones heart. pic.twitter.com/vSFGb99KE8
हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी गेल्या वर्षी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. त्यांनी कॅप्शनमध्ये असंही लिहिलं आहे की, जोडीदाराच्या मृत्यूनं दु: खी झालेला हा पक्षी आहे. आपल्या मित्राला, सहकाऱ्याला शेवटचा निरोप देण्याची त्यांची ही तगमग अनेकांना हेलावून टाकणारी आहे. सुशांत यांनी पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा ऑस्ट्रेलियन गालाह (Australian Galah) नावाचा पक्षी आहे. पिंक आणि ग्रे कॉकॅटोदेखील (Cokatoo) म्हटले जाते.