Viral Video: पक्षाने लावली ट्रक सोबत रेस, पाहा शर्यतीत कोण जिंकल?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 03:25 PM2022-03-13T15:25:52+5:302022-03-13T15:37:19+5:30

एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल.

bird racing with truck video goes viral on internet | Viral Video: पक्षाने लावली ट्रक सोबत रेस, पाहा शर्यतीत कोण जिंकल?

Viral Video: पक्षाने लावली ट्रक सोबत रेस, पाहा शर्यतीत कोण जिंकल?

Next

पक्षांचे मंजुळ आवाज तर तुम्ही अनेकदा ऐकले असतील. शहरांमध्ये आजकाल झाडं कमी झाल्याने याचं प्रमाण कमी असलं तरी गावांमध्ये आजही पक्षांच्या आवाजांनीच लोकांचा दिवस सुरू होतो. हा आवाज ऐकून मनाला शांती आणि प्रसन्नता मिळते. जगात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. मात्र यातील कमीच पक्षांबद्दल आपल्याला माहिती असतं. सोशल मीडियावर पक्षांचा निरनिराळे व्हिडिओ अनेकदा व्हायरल (Viral Videos of Birds) झाल्याचं पाहायला मिळतं.

या व्हिडिओमध्ये कधी त्यांचा समजदारपणा तर कधी मस्ती पाहायला मिळते. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक ट्रक वेगात रस्त्यावर धावत आहे. त्याच्यासोबत एक पक्षीही ट्रकप्रमाणेच वेगात त्याच्यासोबत उडत आहे. हे पाहून असं वाटतं जणू दोघांच्यात शर्यत लागली आहे (Bird Race with Truck).

ट्रक मशीन असल्याने अगदी वेगात चाललेला आहे. मात्र पक्षी आपल्या पंखांच्या मदतीने उडूनही ट्रकची बरोबरी करत होता. हे पाहून सगळेच हैराण झाले. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओला मजेशीर कॅप्शन देत त्यांनी लिहिलं, 'Dhoom4 ची शूटींग सुरू'. अवघ्या 6 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. तर शेकडो लोकांनी लाईक केला आहे.

अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. पक्षाचा हा अनोखा अंदाज नेटकऱ्यांच्याही पसंतीस उतरत आहे. तुम्हीही कदाचित याआधी कधी पक्षाला रस्त्यावर चालणाऱ्या गाड्यांसोबत रेस लावताना पाहिलं नसेल.

Web Title: bird racing with truck video goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.