VIDEO : विजेच्या तारात अडकला होता पक्षी, हेलिकॉप्टरने वाचवला त्याचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 04:55 PM2021-09-03T16:55:33+5:302021-09-03T16:57:49+5:30
सोशल मीडियावर अशाच एका रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक पक्ष्याचा जीव वाचवणाऱ्याचं कौतक करत आहेत.
कधी कधी हवेत उडणारे पक्षी अडचणीत सापडतात. पतंगचा मांजा असो किंवा हवेतील विजेचे तार असो...त्यात ते नेहमीच पक्ष्यांचा मृत्यू होतो. मात्र, काही देशांमध्ये पक्ष्यांच्या जीवनाला फार महत्व दिलं जातं. इतकंच काय तर त्यांच्या रेस्क्यूसाठी हेलिकॉप्टरचाही वापर केला जातो. सोशल मीडियावर अशाच एका रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक पक्ष्याचा जीव वाचवणाऱ्याचं कौतक करत आहेत. सोबतच दुसऱ्यांना यातून शिकण्याची सूचनाही देत आहे.
ही व्हिडीओ क्लिप इन्स्टाग्राम पेज atts_gallery वर शेअर करण्यात आली आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि हजारो लाइक्स मिळाले आहेत. सोबतच शेकडो यूजर्स यावर प्रतिक्रियाही येत आहेत. एकाने लिहिलं की, त्यालाही असं काम करायचं आहे. तर एकाने लिहिलं की, या लोकांना मनापासून सॅल्यूट.
या क्लिपमध्ये तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती हेलिकॉप्टरशी कनेक्टेड स्ट्रक्चरवर बसून आहे. त्याच्या बाजूला विजेचे जाड तार आहेत. ज्यावर एक पक्षी अडकला आहे. हेलिकॉप्टरने त्या व्यक्ती तारांच्या जवळ नेलं जातं. मग तो मोठ्या काळजीपूर्वक पक्ष्याला आपल्या बॅगेत काढतो. नंतर हेलिकॉप्टर तेथून निघून जातं. हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे हे समजू शकलं नाही. पण या व्यक्तीचं कौतुक केलं जात आहे.
काही रिपोर्टनुसार, हा व्हिडीओ अमेरिकेतील व्हर्जिनिया बीचवरचा आहे. जिथे पॉवर लाइनमध्ये एक सीगल पक्षी अडकला आहे. ज्याला व्हर्जिनिया डॉमिनियन पॉवर क्रू ने चॉपरच्या मदतीने रेस्क्यू केलं होतं. ही घटना २०१३ मधील आहे. व्हिडीओ क्लिप पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.