Black Hole Sound: ब्लॅक होलमधून येतो असा आवाज, NASA ने शेअर केला चकीत करणारा ऑडिओ; तुम्हीही ऐका...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 11:10 AM2022-05-08T11:10:31+5:302022-05-08T11:10:48+5:30
Black Hole Sound: नासाने त्यांच्या चंद्रा एक्स-रे ऑब्जर्व्हेटरीमधून हा आवाज रेकॉर्ड केला आहे.
NASA Released Black Hole Sound: अमेरिकन अंतराळ संस्था नासा (NASA) अनेगदा पृथ्वी, अंतराळ आणि चंद्र किंवा इतर गृहांशी संबंधित माहिती सोशल मीडियावरुन शेअर करत असते. नासाने शेअर केलेली कुठलीही पोस्ट अतिशय माहितीपूर्ण आणि चकीत करणारी असते. आता परत एकदा नासाने एक अशी माहिती शेअर केली आहे, जी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. नासाने ब्लॅकहोलमधून येणाऱ्या आवाजाची ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. आतापर्यंत तुम्ही फक्त ब्लॅक होलविषयी वाचलं असेल, पण आता तुम्हाला त्याचा आवाजही ऐकायला मिळणार आहे.
If a black hole erupts in space and no one is around to observe it, does it make a sound?
— NASA (@NASA) May 5, 2022
Not to worry; the @ChandraXray Observatory is here with new #BlackHoleWeek sonifications from galaxy clusters far, far away. Listen: https://t.co/yGu0RuP7TXpic.twitter.com/6rAgJafmAa
अशाप्रकारे रेकॉर्ड केला आवाज
मीडिया रिपोर्टनुसार, नासाच्या एका सॅटेलाइटने हा आवाज रेकॉर्ड केला आहे. हा आवाज मानव थेट ऐकू शकत नाही. मानवाला ऐकवण्यासाठी या आवाजाला ध्वनी तरंगात बदलण्यात आले आहे. मानवासाठी 57 ऑक्टेव्हला ऐकणे शक्य नाही, त्यामुळे एका मशीनच्या मदतीने त्या तरंगात नवीन नोट्स जोडले गेले आहेत. त्यानंतरच एक ऐकण्यालायक आवाज तयार झाला आहे. नासाने हा आवाज चंद्रा एक्स-रे ऑब्जर्व्हेटरीमधून कॅप्चर केला आहे.
अंतराळात आवाज नसल्याचा समज चुकीचा
याबाबत नासा सांगते की, अंतराळात कुठलीही वस्तू नाही, ही एक भलीमोठी पोकळी आहे. त्यामुळे अंतराळात आवाज नाही, अशी चुकीची धारणा पसरी होती. पण, आकाश गंगेची गोष्ट वेगळी आहे. आकाश गंगेत मुभलक प्रमाणात गॅस उपलब्ध आहे, जो हजारो आकाश गंगांना आपल्यात सामावून घेऊ शकतो. आता समोर आलेला आवाज ज्या ब्लॅक होलचा आहे, तो पृथ्वीपासून 20 कोटी प्रकाश वर्ष अंतरावर आहे. तसेच, हा 1.1 कोटी प्रकाश वर्ष पसरलेल्या पर्सियस आकाशगंगेचा भाग आहे.