गमावली दृष्टी पण सोडली नाही जिद्द, इतके कष्ट करतोय हा अंध वृद्ध की तुम्ही ठोकाल कडक सॅल्युट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 07:45 PM2021-10-10T19:45:48+5:302021-10-10T19:50:12+5:30

या दृष्टिहीन वृद्ध व्यक्तीने आपली दृष्टि गमावली आहे. पण हार न मानता हा वृद्ध मेहनत करुन आपले पोटभरताना दिसत आहे. या वृद्धाच्या मेहनतीकडे पाहून सोशल मीडियावरील अनेक यूजर्स या वृद्धाचे कौतुक करत आहेत.

blind old man making banana chips in Nashik video goes viral on social media | गमावली दृष्टी पण सोडली नाही जिद्द, इतके कष्ट करतोय हा अंध वृद्ध की तुम्ही ठोकाल कडक सॅल्युट

गमावली दृष्टी पण सोडली नाही जिद्द, इतके कष्ट करतोय हा अंध वृद्ध की तुम्ही ठोकाल कडक सॅल्युट

googlenewsNext

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मनोरंजनाचे असताता तर काही व्हिडीओ आपल्याला आरसा दाखवणारे असतात. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक दृष्टिहीन वृद्ध व्यक्ती केळीच्या चिप्स बनवताना दिसत आहे.

या दृष्टिहीन वृद्ध व्यक्तीने आपली दृष्टि गमावली आहे. पण हार न मानता हा वृद्ध मेहनत करुन आपले पोटभरताना दिसत आहे. या वृद्धाच्या मेहनतीकडे पाहून सोशल मीडियावरील अनेक यूजर्स या वृद्धाचे कौतुक करत आहेत. नाशिकच्या मखमलाबाद रोडच्या एका बाजूला ह्या वृद्धाचा केळीच्या चिप्सचा स्टॉल आहे. भट्टीच्या उष्णतेमुळे आणि वाफेमुळे त्याची दृष्टी गेली आहे. पण हार न मानता हा वृद्ध आयुष्याची लढाई लढण्यासाठी पुन्हा उभा राहीला आहे.


व्हायरल होणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर यूजर संस्कार खेमानी यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १२ मिलीयनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना, कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘या वृद्धाला सलाम. जर तुम्ही नाशिकमध्ये कोणाला ओळखत असाल तर त्यांना या वृद्धाकडून केळीच्या चिप्स खरेदी करायला सांगा. आपण मिळून या वृद्ध व्यक्तीची दृष्टी परत आणण्यास मदत करू शकतो.' हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक व्हिडिओवर खूप प्रतिक्रिया देत आहेत, एका युजरने कमेंट केले आहे की ‘या वृद्ध माणसाचा खूप आदर वाटतो. ‘

 

Web Title: blind old man making banana chips in Nashik video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.