Video : भयंकर वादळात लॅंडिंग करणाऱ्या विमानाचा व्हिडीओ व्हायरल, काय झालं असेल प्रवाशांचं?  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 11:59 AM2020-02-15T11:59:23+5:302020-02-15T12:00:49+5:30

सुदैवाने यावेळी कोणतीही दुर्घटना झाली नाही. पायलटने आपला अनुभव दाखवत समजदारीने काम केलं. तर सगळेच प्रवासी सुरक्षित आहेत.

Blown away viral video of a plane in midair attempted landing during storm | Video : भयंकर वादळात लॅंडिंग करणाऱ्या विमानाचा व्हिडीओ व्हायरल, काय झालं असेल प्रवाशांचं?  

Video : भयंकर वादळात लॅंडिंग करणाऱ्या विमानाचा व्हिडीओ व्हायरल, काय झालं असेल प्रवाशांचं?  

Next

गेल्या काही दिवसांपूर्वी यूरोपमधील कियारा वादळ चांगलंच चर्चेत होतं.  या वादळामुळे यूरोपमधील अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली होती. रेल्वे सेवाही पूर्णपणे बाधित झाली होती. ब्रिटन आणि आयरलॅंडमध्ये वेगाने वारा वाहत होता. इतकेच नाही तर वीजही बंद पडली होतील. अशातच बर्मिघम एअरपोर्टवरील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

एक विमान वादळादरम्यान टेक ऑफ करत होतं. इतक्यात जोरदार वारा सुरू झाला. विमान काही वेळ हवेतच हलत होतं. हा व्हिडीओ पाहताना आपल्या काळजाचा ठोका चुकतो तर विचार करा आत बसलेल्या प्रवाशांचं काय झालं असेल.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला असून आतापर्यंत ३ लाख ५० हजारांपेक्षाही अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान बेलफास्टहून येत होतं. वादळामुळे विमानाला बर्मिंघमला लॅन्ड करावं लागलं. नंतर हे विमान पुन्हा टेक ऑफ करू लागलं तेव्हा आणखी वेगाने वारा सुरू झाला होता.

सुदैवाने यावेळी कोणतीही दुर्घटना झाली नाही. पायलटने आपला अनुभव दाखवत समजदारीने काम केलं. तर सगळेच प्रवासी सुरक्षित आहेत.


Web Title: Blown away viral video of a plane in midair attempted landing during storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.