Blue Tick on Twitter: ट्विटरला 'सुलभ शौचालय' बनवायचा विचार आहे का?; Elon Musk च्या घोषणेनंतर नेटकऱ्यांच्या अफलातून कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 02:12 PM2022-11-02T14:12:47+5:302022-11-02T14:13:32+5:30

युजर्सने मस्क यांच्या घोषणेवर मजेदार मीम्सही शेअर केलेत

Blue Tick on Twitter Elon Musk announces plan netizens share hilarious memes comedy comments | Blue Tick on Twitter: ट्विटरला 'सुलभ शौचालय' बनवायचा विचार आहे का?; Elon Musk च्या घोषणेनंतर नेटकऱ्यांच्या अफलातून कमेंट्स

Blue Tick on Twitter: ट्विटरला 'सुलभ शौचालय' बनवायचा विचार आहे का?; Elon Musk च्या घोषणेनंतर नेटकऱ्यांच्या अफलातून कमेंट्स

Next

Blue Tick on Twitter: Elon Musk ट्विटरचे नवीन बॉस होताच साइटवर विविध बदल करण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यातील सर्वात मोठा बदल 'ब्लू टिक'मुळे झाला आहे. मस्कने स्पष्टपणे सांगितले आहे की आता कोणीही ८ डॉलर्सचे शुल्क भरून ब्लू टिक मिळवू शकतो. यासोबतच यूजर्सना अनेक अतिरिक्त फीचर्स देखील मिळतील. ट्विटरच्या पक्ष्याला 'मुक्त' करणाऱ्या मस्कला 'पॉवर टू पीपल' अंतर्गत ब्लू टिकवर दर आकारण्याची कल्पना सुचली असेल तरी ट्विटर युजर्सना ती कल्पना अजिबातच आवडलेली दिसत नाही. त्यामुळेच लोकांनी एवढ्या कमेंट केल्या की #bluetick हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडदेखील होऊ लागला आहे. एलॉन मस्कने ट्विट करून ही माहिती लोकांना देताच, युजर्सनी भन्नाट मीम्सचा वर्षाव करत त्याची खिल्ली उडवली.

मीम्स आणि कमेंट्स शेअर करताना एका यूजरने लिहिले की, 'भाई, मला दोन (ब्ल्यू टिक) घ्यायच्या आहेत, भाव जरा नीट सांगा' @RoflGandhi_ हँडलवरून मस्कला उत्तर देताना युजरने लिहिले, 'एलॉन सेठ जी, ट्विटरला सुलभ शौचालय बनवायचा विचार आहे का?' त्याचवेळी @simplykashif हँडलवरून काशिफ रझा नावाच्या युजरने लिहिले आहे, 'भाऊ दोन टीक घ्यायच्यात, काही तरी कमी करा.' त्याच वेळी एका युजरने हेरा फेरी चित्रपटातील मीम शेअर करत, 'इधर जहर खाने को भी पैसा नही है' हे लोकप्रिय मीम शेअर केले.

--

--

--

--

दरम्यान, ट्विटरवर सध्या ज्यांच्याकडे ब्ल्यू टिक आहे, त्यांना यापुढे प्रत्येक महिन्याला ८ डॉलर्स भरून ती सेवा चालू ठेवता येणार आहे. त्यामुळे आता एलॉन मस्क यांच्या नव्या निर्णयाचा ट्विटरला फायदा होता की फटका बसतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Blue Tick on Twitter Elon Musk announces plan netizens share hilarious memes comedy comments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.