मी प्रेगनंट आहे, कामावर येणार नाही, हे ऐकताच बॉसने दिला नकार, आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 01:26 PM2022-11-07T13:26:47+5:302022-11-07T13:28:49+5:30

आपल्या प्रेगन्सीची माहिती ऑफीसमध्ये दिल्याने एका महिलेला आपली नोकरी गमवावी लागली आहे. या प्रकरणी त्या महिलेने कोर्टात याचिका दाखल केली आहे.

boss fired the woman as soon as she told me that I am pregnant and will not come to work court fined the company | मी प्रेगनंट आहे, कामावर येणार नाही, हे ऐकताच बॉसने दिला नकार, आणि मग...

मी प्रेगनंट आहे, कामावर येणार नाही, हे ऐकताच बॉसने दिला नकार, आणि मग...

googlenewsNext

आपल्या प्रेगन्सीची माहिती ऑफीसमध्ये दिल्याने एका महिलेला आपली नोकरी गमवावी लागली आहे. या प्रकरणी त्या महिलेने कोर्टात याचिका दाखल केली आहे. कोर्टाने कंपनीला ४ लाख ६० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यास सांगितले आहे. 

एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या ३० वर्षीय हेजेज स्टेन्स या महिलेसोबत ही घटना घडली आहे. हे प्रकरण ब्रिटन येथील आहे. हेजेज एका खासगी कंपनीमध्ये कॅन्ट्रक्टवर काम करते. तिने काही दिवसापूर्वी कंपनीच्या महिला बॉसला आपण प्रेगनंट असल्यामुळे कामावर येऊ शकत नाही असं सांगितले, यानंतर बॉसने चिडून हेजेस यांना कामावरुन काढून टाकले. 

Breaking : Danushka Gunathilaka ला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून हकालपट्टी; श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय

हेजेस यांनी ज्यावेळी बॉसला आपण प्रेगनंट असल्यामुले कामावर येत नाही असं सांगितले, त्यावेळी महिला बॉस नाराज जाली. यावेळी तिने हेडजेस यांना सांगीतले की,'आम्ही तुला फक्त करारावर कामावर घेतले आहे. आणि आता तू मला सांगत आहेस की तू प्रेगनंट आहेस.' यानंतर बॉसने हेजेसला कामावरुन काढले. या घटनेच्या दोन महिन्यांनंतर हेजेसने कंपनीच्या विरोधात ट्रिब्युनल कोर्टात खटला दाखल केला.

ही घटना २०१९ मध्ये घडली होती. आता या घटनेवर कोर्टाने निकाल दिला आहे. न्यायाधिकरण न्यायालयात सुनावणीदरम्यान हेजेसला एका ग्राहकाच्या घरी जायचे होते, असं सांगण्यात आले होते. पण, हेजेसने प्रेगनंटचे कारण देत जाण्यास नकार दिला. यावेळी बॉसने गोंधळ घालून हेजेसला नोकरीवरुन काढून टाकले. 

यावेळी कोर्टात हेजेसने या गोष्टीला अपमान झाल्याचे म्हटले, आणि बॉसने भेदभाव केला असल्याचे सांगितले. या सुनावणीत कोर्टाने हेजेसच्या बाजूने निकाल दिला. कंपनीला ४ लाख ६० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यास कंपनीला आदेश दिला.   

Web Title: boss fired the woman as soon as she told me that I am pregnant and will not come to work court fined the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.