"घरातल्या एखाद्याचा मृत्यू झाला तरच..."; अपघातामुळे उशीरा गेलेल्या कर्मचाऱ्याला बॉसने फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 06:02 PM2024-10-23T18:02:11+5:302024-10-23T18:04:48+5:30

सोशल मीडियावर एका कंपनीच्या कर्मचाऱ्याची अपघातानंतरची पोस्ट व्हायरल होत आहे.

Boss scolded the man for reaching office late after car accident | "घरातल्या एखाद्याचा मृत्यू झाला तरच..."; अपघातामुळे उशीरा गेलेल्या कर्मचाऱ्याला बॉसने फटकारलं

"घरातल्या एखाद्याचा मृत्यू झाला तरच..."; अपघातामुळे उशीरा गेलेल्या कर्मचाऱ्याला बॉसने फटकारलं

Social Viral : जर तुम्ही ऑफिसला जाताना अचानक तुमचा अपघात झाला. तुम्ही तुमच्या बॉसला घडलेला प्रसंग सांगता तेव्हा तो तुमची परिस्थिती समजवून घेईल आणि तुमची काळजीपूर्वक विचारपूस करेल असं तुम्हाला वाटतं. मात्र त्याऐवजी बॉस तुम्हाला ऑफिसला कधी पर्यंत पोहोचू शकतो असं विचारत असेल तर. हे किती दुःखद आहे. नेमका हाच प्रकार एका कर्मचाऱ्याच्या बाबतीत घडला. कर्मचाऱ्याने त्याच्या अपघातग्रस्त कारचा फोटो बॉसला पाठवला होता. त्यानंतर बॉसने दिलेले उत्तर पाहून कर्मचाऱ्याला आणखीन धक्का बसला. बॉसने दिलेल्या उत्तराचा स्क्रीनशॉर्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनेकदा कर्मचारी हा त्याच्या बॉसवर कामाच्या बाबतीत नाराज असतो. अशाच एका कर्मचाऱ्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जी पाहून तुम्हीही म्हणाल की देवाने असा बॉस कुणालाही देऊ ​​नाही. ऑफिसला जाताना एका कर्मचाऱ्याचा कार अपघात झाला होता. जेव्हा त्याने त्याच्या मॅनेजरला ऑफिसला पोहोचण्यास उशीर होणार असल्याचे सांगितले तेव्हा त्याने खंत व्यक्त करण्याऐवजी त्यालाच खडसावले. उशीर होण्याचे हे चांगले कारण नाही आणि कुटुंबात मृत्यू झाला असेल तरच उशीरा येणं बरोबर असल्याचे बॉसने म्हटलं आहे. या पोस्टवरुन वरिष्ठांना कर्मचाऱ्याची किती काळजी आहे हे दिसून येत असल्याचे सोशल मिडिया युजर्सनी म्हटलं आहे. एका बॉसने आपल्या कर्मचाऱ्याचा अपघात झाल्यावर दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एक्सच्या एका पोस्टमध्ये @kirawontmiss नावाच्या युजरने कार अपघातात वाचल्यानंतर कर्मचारी आणि व्यवस्थापक यांच्यातील संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. स्क्रीनशॉट शेअर करताना कॅप्शनमध्ये, 'तुमच्या मॅनेजरने असे सांगितले तर तुम्ही त्यावर काय प्रतिक्रिया द्याल?, असं म्हटलं होतं. या स्क्रीनशॉटमध्ये कर्मचारी आणि बॉसमधील मेसेज दिसत आहे, ज्यामध्ये सुरुवातीला कर्मचाऱ्याने मॅनेजरला समोरून पूर्ण चिरडलेल्या कारचा फोटो पाठवल्याचे दिसत आहे. त्याच्या खराब झालेल्या अवस्थेवरून हे स्पष्ट होते की कारचा भीषण अपघात झाला होता.

त्या मेसेजवर नेमंक काय झाले, अपघात कसा झाल किंवा त्याचा कर्मचारी कसा आहे हे विचारण्याऐवजी बॉसने विचित्र असं उत्तर दिलं. बॉसने 'तू किती वाजता ऑफिसला पोहोचणार ते मला सांगून ठेवा, असं बॉसने म्हटलं. त्यानंतर बॉसने मेसेज केला की, "तुला उशीर का होणार हे मला समजले. पण कुटुंबातील एखाद्याच्या मृत्यूशिवाय तुला कामावर येण्यापासून रोखणारी कोणतीही गोष्ट कोणत्याही कंपनीत माफ केली जात नाही."

दरम्यान, या व्हायरल स्क्रीनशॉर्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. असे मॅनेजर घाबरवतात, आपले आयुष्य इतके दयनीय आहे का?, असा सवाल एका नेटकऱ्याने केला आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने, "ब्लॉक आणि डिलिट कर. त्या कामाकडे परत जाऊ नको आणि जर भविष्यात कोणत्याही कंपनीने तू काम का सोडले असे विचारले तर तू हा स्क्रीनशॉट काढून दाखव," असं म्हटलं आहे.
 

Web Title: Boss scolded the man for reaching office late after car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.