वयाच्या १७ व्या वर्षी खरेदी केलं पहिलं घर, आज आहे ३७ घरांचा मालक; कमाई ऐकून व्हाल अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 06:28 PM2023-03-20T18:28:22+5:302023-03-20T18:29:33+5:30

एका व्यक्तीनं वयाच्या १७ व्या वर्षी आपलं पहिलं घर खरेदी केलं होतं. आज त्याच व्यक्तीच्या नावावर एकूण ३७ घरं आहेत.

bought first house in 17 years now 37 houses owner income will surprise you | वयाच्या १७ व्या वर्षी खरेदी केलं पहिलं घर, आज आहे ३७ घरांचा मालक; कमाई ऐकून व्हाल अवाक्!

वयाच्या १७ व्या वर्षी खरेदी केलं पहिलं घर, आज आहे ३७ घरांचा मालक; कमाई ऐकून व्हाल अवाक्!

googlenewsNext

नवी दिल्ली-

एका व्यक्तीनं वयाच्या १७ व्या वर्षी आपलं पहिलं घर खरेदी केलं होतं. आज त्याच व्यक्तीच्या नावावर एकूण ३७ घरं आहेत. त्याची महिन्याभराची कमाई लाखोंच्या घरात आहे. तो पॉडकास्ट शोमध्ये लोकांना प्रॉपर्टीशी निगडीत टिप्स देखील देताना दिसतो. 

न्यूजडॉटकॉम एयूच्या रिपोर्टनुसार गोरो गुप्ता नावाच्या तरुणाची महिन्याची कमाई जवळपास १३ लाख रुपये इतकी आहे. गोरो गुप्ता आपल्या व्यवसायाच्या निमित्तानं बहुतांश वेळ ऑस्ट्रेलियाच्या विक्टोरिया आणि गोल्ड कोस्टमध्ये वास्तव्याला असतो. 

गोरो गुप्ता यानं वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी आपल्या वडिलांची मदत घेत पहिलं घर खरेदी केलं होतं. आता गोरो ४० वर्षांचा आहे आणि त्याच्या यशाची कहाणी प्रेरणादायी आहे. महत्वाची गोष्ट अशी की गेल्या १० वर्षात त्यानं १० प्रॉपर्टी खरेदी केल्या आहेत. 

प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी त्यानं ऑफसेट लोनचा वापर केला. यामुळेच तो एकामागोमाग एक प्रॉपर्टी विकत घेत राहिला. गोरो गुप्ता म्हणाला की त्याच्या यशाच्या मागे त्याच्या आई-वडिलांचं योगदान आहे. कारण त्यांनीच घर खरेदी करताना सुरुवातीला पैशांची मदत केली होती. 

गोरो गुप्ता म्हणाला की घर खरेदी करण्यासाठी ऑफसेट लोक घेतलं होतं. गोरोनं सांगितलं की जर तुम्हाला ऑफसेट लोनचा वापर कसा करायचा याची माहिती असेल तर तुम्ही १० वर्षांच्या आत सर्व कर्ज फेडून टाकू शकता. 

लोकांनी प्रॉपर्टीमध्येच गुंतवणूक करायला हवी असंही गोरो सांगतो. कारण यात पैसा नेहमी वाढतो. यात गोरोनं व्यावसायिक प्रॉपर्टीवर अधिक भर दिला. गोरो आपल्या फावल्या वेळेत आर्थिक नियोजनाच्याही टिप्स देत असतो. यामुळेच तो ऑस्ट्रेलियातील व्यावसायिक जगात लोकप्रिय आहे.

Web Title: bought first house in 17 years now 37 houses owner income will surprise you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.